डॉ भावेश वाघ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

शांत, संयमी, विनम्र, अभ्यासू, आरोग्यवर्धिनी योजनेचे हजरजबाबी कार्यक्रम अधिकारी डॉ भावेश वाघ यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आज कार्यालयीन बैठकीनंतर सन्मा. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांना सवयीनुसार पुस्तकभेटीचा योगायोग साधला. डॉ भावेश यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये आपल्या कार्यक्रमावर चांगली पकड जमवली आहे. आरोग्यवर्धिनी केंद्रांच्या सक्षमीकरण, पदभरती व ब्रँडिंगमध्ये त्यांची भूमिका मौलिक राहिली आहे. कार्यक्रमासंबंधीत उद्भवणाऱ्या अडचणी, न्यायालयीन प्रकरणे, तक्रारी यांच्या बाबतीत मार्गदर्शक सूचनांना बांधील राहत त्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच नियमानुसार कार्यवाहीची भूमिका घेतली आहे. सहकाऱ्यांच्या बाबतीत नेहमीच सौहार्द, नम्रता व मदतीची भावना ठेवणारे डॉ भावेश कार्यालयातील सर्वात मितभाषी अधिकारी म्हणून ओळखले जातात. राज्यात आरोग्यवर्धिनी केंद्रांच्या माध्यमातून आरोग्य संस्थांचा कायापालट होत असताना भविष्यात या केंद्रांच्या माध्यमातून गरजू लोकांना  पारदर्शक व अधिक परिणामकारक  आरोग्य सेवा पुरविल्या जाव्यात याकरिता ते यापुढेही प्रयत्नशील राहतील अशी अपेक्षा आहे.   

वैभव

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त