मुंबई गोवा महामार्गाचे काम गतीने पूर्ण करा

समृद्धी महामार्गाचे काम विक्रमी वेळेत पूर्ण करून त्याचे लोकार्पण देखील करण्यात आले. मात्र राजधानी मुंबई व उपनगरांतील सर्वात जास्त लोकांची गावे असलेल्या कोकणात जाण्यासाठी मात्र त्यांना वर्षानुवर्षे खराब रस्त्यातुन वाट काढावी लागते. आज राज्याच्या कोणत्याही भागापेक्षा जास्त संख्येने लोक मुंबई गोवा मार्गाने प्रवास करतात. यात प्रामुख्याने कोकणी लोकांची संख्या जास्त असते. सणासुदीला, उन्हाळी सुट्ट्यांमध्ये, विविध यात्रांसाठी दरवर्षी मुंबईत राहणारी कोकणी कुटुंबे घराकडे धाव घेतात. मात्र रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे या मार्गावर अपघात, वाहने नादुरुस्त होण्याच्या घटना नेहमीच घडतात. अशा या महत्वपूर्ण मार्गाचे काम अनेक वर्षांपासून सुरू आहे मात्र कधीच पूर्ण होत नाही. पावसाळ्यात तर या मार्गाची चाळण होऊन जाते. कोकण परिसर व गोव्यासारख्या राज्याला जोडणाऱ्या या मार्गाचे काम समृद्धीसारखा उपक्रम हाती घेऊन दर्जेदार व जलद गतीने पूर्ण करण्यास काय हरकत आहे?


वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त