तरच समाज, राज्य, देश आणि नागरिकही सुरक्षित राहतील

स्‍वातंत्र्याच्‍या ७५ वर्षानंतरदेखील देशातील जातीयवाद संपुष्‍टात आलेला नाही हे खूप दुर्दैवी आहे. सर्वधर्मसमभाव जोपासणा-या आपल्‍या देशात अनेक समाजविघातक प्रवृत्‍ती सक्रिय आहेत ज्‍या सातत्‍याने आतंकवाद पसरवणा-या घटकांना  समर्थन देत असतात. २६/११ चा हल्‍ला असो की बॉम्‍बस्‍फोटांची मालिका या सर्व दहशतवादी घटनांमध्‍ये ‘घरचे भेदी’ उघड झालेले आहेत. त्‍यामुळे समाजात पोसल्‍या जात आलेल्‍या अशा प्रवृत्‍ती शोधुन त्‍यांचेवर कठोर कारवाई करण्‍याचे मोठे आव्‍हान आपल्‍या तपास यंत्रणांसमोर आहे. कहर म्‍हणजे नुकत्‍याच गॅंगस्‍टर अतिक अहमद याच्‍या हत्‍येचा उघड निषेध करणारेदेखील दिसून आले आहेत. मात्र काही मोजक्‍या विघातक वृत्‍तीच्‍या लोकांमुळे त्‍या संपूर्ण समाजाला आरोपीच्‍या पिंज-यात उभे करणे नक्‍कीच योग्‍य नव्‍हे. मात्र चुकीच्‍या व्‍यक्‍तींचा निषेध हा त्‍या त्‍या समाजातून मोठया तिव्रतेने झाला पाहीजे, अशा व्‍यक्‍तींना हददपार केले पाहिजे. तरच समाज, राज्‍य, देश व नागरीकदेखील सुरक्षित राहतील. 

वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त