असा 'कीर्ती' कुमार न होणे मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे ऑफिसला जाण्यासाठी निघालो तोच एक अत्यंत धक्कादायक आणि अस्वस्थ करणारी गावाकडची बातमी कानावर आली. ज्याला त्याच्या लहानपणापासून सोबतीने मोठे होताना पाहत आलो तो माझा चुलतबंधू किर्ती यशवंत भोईर याचे अकाली निधन झाल्याचा तो निरोप होता. गेले कित्येक महिने आजारपणाशी संघर्ष करणाऱ्या किर्तीने अखेर सर्वांचा निरोप घेतला. अवघ्या पस्तीशीतील किर्तीने अगदीच कमी मात्र सर्वांनाच हेवा वाटावा असे आयुष्य जगले. आज जीवाला जीव लावणारा कुटुंबकबिला आणि पुढ्यात असणारे सुंदर आयुष्य हे सारे अर्धवट सोडून जाणाऱ्या कीर्तीच्या अंतिम यात्रेत धाय मोकलून रडणारी त्याची आई (काकू) आणि कधी न रडणारे मात्र आज आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देणारे त्याचे वडील (यशवंत काका) पाहून मन अत्यंत गहिवरून आले. त्याला आजारातून बरे करण्यासाठी ह्या कुटुंबाने विशेषतः धाकट्या संतोष काकाने अगदी जीवाचे रान केले. जिथे मार्ग सापडेल तिथे त्याच्या उपचारासाठी धाव घेताना मी त्यांना पाहिलंय. मात्र काही घटना ह्या विधिलिखित असतात आणि त्या चुकवता येत नाहीत असे आमचे बाबा म्हणायचे. त्...
सलग दुसऱ्या वर्षी डॉ डी बी मार्ग पोलीस दवाखान्यामार्फत शिबिराचे आयोजन मंगळवार दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने डॉ. डी. बी. मार्ग पोलीस दवाखाना यांचेमार्फत डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९ ते दुपारी २ या कालावधीत सदर शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरासाठी डॉ. हितेश पगारे यांच्या नेतृत्वाखालील जे. जे. रुग्णालयामधील राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या ब्लड बँकेच्या टीममधील डॉक्टर व त्यांचे सहकारी यांनी महत्त्वाची भुमिका राबविली. डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नितीन दळवी, पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत पाटील व त्यांचे सर्व सहकारी पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आयोजनासाठी प्रत्यक्ष मदत करून सहकार्य केले. सदर शिबिराचे उदघाटन नागपाडा पोलीस रुग्णालयाचे पोलीस शल्य चिकित्सक डॉ. गजानन सानप यांचे हस्ते पार पडले. रक्तदानाचे सार्वजनिक जीवनातील महत्व विषद करून त्यांनी रक्तदात्याना मार्गदर्शन केले. सदर शिबिरात एकूण ४५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. उन्हाळ्यात नेहमीच रक्ताचा तुटवडा जाण...
डॉ. दा. भ. मार्ग पोलीस दवाखान्यामार्फत आरोग्य तपासणी व रक्त दान शिबीर सशस्र पोलिस मुख्यालय ताडदेव यांच्या माध्यमातून पोलीस प्रशिक्षण सभागृहात येथे मंगळवार दिनांक ४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. सर जे. जे. रुग्णालयीन रक्तपेढी मार्फत सदरचे रक्तदान शिबीर घेण्यात आले. डॉ. दा. भ. मार्ग पोलीस दवाखाना मधील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांनी ताडदेव येथील सर्व पोलीस बांधवांची आरोग्य तपासणी करून त्यांचेवर औषधोपचार केले. तसेच ताडदेव पोलीस दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांनी देखील सदर कामात मदत केली. या शिबिरात वजन, उंची करून BMI ची नोंद घेण्यात आली. तसेच Heamoglobin, blood sugar व blood cholesterol ई रक्ताच्या तपासण्या करण्यात आल्या. ह्या शिबिरात १२६ पोलीस कर्मचारी व अधिकारी तसेच पोलीस वसाहतीमधील त्यांच्या कुटुंबीयांची आरोग्य तपासणी करण्यात आली व १९ दात्यांनी रक्तदान केले. सशस्र पोलिस मुख्यालय ताडदेव यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती मौसमी पाटील यांनी शिबिराचे उद्घाटन करून आपल्य...
Comments
Post a Comment