रेल्वे प्रवास वेगवान नव्हे तर सुरक्षित करण्याची गरज

आज देशातील बहुतांश जनता स्वस्त व वेगवान प्रवास म्हणून रेल्वे सेवेचा वापर करते. त्यामुळे रेल्वे गाड्यांवर प्रवाशांचा प्रचंड भार आहे हे नाकारून चालणार नाही. अशाही परिस्थितीत रेल्वे सेवा नियमित व वेळेवर चालवण्याची कसरत रेल्वे प्रशासनास करावी लागते. रेल्वेवर पडणारा अतिरिक्त प्रवाशी भार कमी करण्यासाठी अनेक शहरांमध्ये मेट्रो, मोनो रेल सारखे अंतर्गत प्रकल्प राबवले जात आहेत ज्याचा सकारात्मक परिणाम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थापनावर होताना दिसत आहे. मात्र हे सर्व उपाय करत असताना रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्राधान्याने विचार नक्कीच व्हायला हवा. ओडिशा मध्ये घडलेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असून ती टाळता आली असती. अपघातांमध्ये शेकडोंच्या संख्येने बळी जाण्याच्या घटना यापूर्वीही घडलेल्या आहेत. मात्र तंत्रज्ञान इतके पुढारलेले असताना तांत्रिक बाबींमध्ये दोष निर्माण झाल्याने होणाऱ्या दुर्घटना नक्किच रोखता येतील. यासाठी रेल्वे रूळ व गाड्यांची देखभाल, दुरुस्ती तसेच मोटरमन व रेल्वे यंत्रणा हाताळणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे शारीरिक, मानसिक स्वास्थ व प्रशिक्षण या बाबी वेळोवेळी तपासणे क्रमप्राप्त ठरते. रेल्वे प्रवास केवळ गतिमान करून उपयोगाचे नाही तर सुरक्षित प्रवासाकडे अधिक लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे.



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त