जॉयच्या कार्यास समाजाप्रती संवेदनशील व्यक्तींची अमूल्य साथ - वैभव पाटील .... जॉय संस्थेचा शनिवारी जव्हारच्या कर्णबधिर शाळेत उपक्रम
काल आम्ही जव्हार येथील प्रगती प्रतिष्ठानच्या निलेश मुरडेश्वर कर्णबधिर विद्यालयाला भेट दिली. निमित्त होते आमच्या जॉय ऑफ गिव्हिंग या सामाजिक संस्थेमार्फत आयोजित करण्यात आलेला विद्यार्थी भेट उपक्रम. यावेळी विद्यालयातील ६५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे तसेच वसतिगृहासाठी किराणा सामानाचे वाटप करण्यात आले. मुंबईत विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या समाजाप्रती संवेदनशील व्यक्तींच्या सहयोगातून जॉय ऑफ गिव्हिंग या संस्थेची निर्मिती जोगेश्वरी येथील शिक्षक श्री गणेश हिरवे यांच्या संकल्पनेतून करण्यात आली आहे. संस्थेतील सदस्यांना श्री हिरवे यांनी व्हाट्सएपसारख्या सोशल माध्यमाद्वारे एकत्र आणत याच सभासदांच्या सहभागातून मुंबई, ठाणे तसेच पालघर जिल्ह्यातील आदिवासी, गरजू विद्यार्थी, अनाथ मुले तसेच वृद्धाश्रमातील वृद्धांना सातत्याने गरजेच्या वस्तू पोहोचवण्याचे कार्य ते अविरतपणे करत आहेत. कोरोना काळातदेखील अनेक गरजूंना मदत पोहोचवण्याचे कार्य जॉय संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. संस्थेच्या सभासदांच्या वर्गणीतून आणि समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहयोगातून काल प्रगती प्रतिष्ठानच्या शाळेतील कर्णबधिर मुलांसाठी गरजेच्या वस्तू घेऊन आम्ही पोहोचलो. यात मुलांसाठी शालेय बॅग, वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिल, पॅड, कोलगेट, साबण यांसह वसतिगृहासाठी तांदूळ, गहू, तूरडाळ, मुगडाळ, मसुरडाळ, रवा, पोहे, मूग, मटकी हे साहित्य मुलांसाठी उपलब्ध करून देण्यात आले. याप्रसंगी माझेसह आमच्या संस्थेचे अध्यक्ष संस्थापक आदर्श शिक्षक गणेश हिरवे सर, कार्यकारिणी सदस्य अंसुता डिसोझा, मीना भूतकर, भूषण मुळ्ये, दत्ता रातवडकर, चंद्रशेखर सावंत, हॅप्पी रायडर गजानन पाटील, निलेश घोडविंदे, तसेच संवेदनशील समाजसेवक व माझे कार्यालयीन सहकारी विजय पोस्तुरे, जितू नागवेकर, आडीवडेकर, राणे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच संस्थेच्या वतीने मुख्याध्यापक श्री बळीराम पाटील, अधीक्षक राजेंद्र मुकणे, एमएसडब्लू सत्येंद्र काळकर, लिपिक केशव भोईर, दीपक रिकामे, टेलरिंग विभागाच्या रसिका रिकामे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्री सत्येंद्र काळकर यांनी याप्रसंगी प्रगती प्रतिष्ठान संस्थेच्या कार्याची सविस्तर माहिती दिली तर गणेश हिरवे यांनी जॉय संस्थेची निर्मिती, उद्देश व वाटचालीविषयी उपस्थितांना माहिती देत उपक्रमासाठी योगदान देणाऱ्या सर्व सभासदांचे आभार मानले. आपल्या प्रास्ताविकात मी जॉय संस्था करत असलेले कार्य, कार्यक्रम आयोजनाची पार्श्वभूमी तसेच आजवर जॉयने राबवलेल्या उपक्रमांची सविस्तर माहिती देत प्रत्येक कार्यक्रमाचे श्रेय, टीम वर्क म्हणून संस्थेच्या प्रत्येक उपक्रमासाठी साहाय्य करणाऱ्या सर्व दानशूर व संवेदशील व्यक्तींचे असल्याचे मत व्यक्त केले. अंसुता डिसोझा यांनीदेखील जॉय संस्थेच्या सर्व उपक्रमांचे कौतुक करत उपस्थितांना समुपदेशनाद्वारे अनेक महत्वपूर्ण टिप्स दिल्या. याप्रसंगी श्री विजय पोस्तुरे आणि जितेंद्र नागवेकर यांनीदेखील आपली मनोगते व्यक्त करत मुलांचे कौतुक केले. शेवटी मुख्याध्यापक बळीराम पाटील सरांनी जॉय संस्थेचे आभार मानत मुलांसाठी ही भेट अविस्मरणीय असल्याचे सांगितले. यावेळी शाळेतील मूकबधिर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद खूप समाधान देऊन गेला. जन्मजात शारीरिक व्यंग लाभले असले तरी ह्या मुलांची शिक्षणाची जिद्द व त्यांच्यातील विविध कलागुण आयुष्यात किरकोळ कारणांनी नैराशत्व पत्करणाऱ्यांसाठी आदर्श ठरावा असेच आहे. त्यांना शिक्षणाचे व प्रगतीचे धडे गिरवणाऱ्या व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटत असलेल्या प्रगती प्रतिष्ठानच्या ह्या उपक्रमशील शाळेचेदेखील मनःपूर्वक कौतुक आणि त्यांना शुभेच्छा.
वैभव
जॉयच्या जव्हार येथील उपक्रमासंबंधित प्रसिध्द बातम्या व वृत्ते
http://www.satbaranewsexpress.in/NewsDetails.aspx?NewsId=5513
http://batmidarmaza.blogspot.com/2023/06/blog-post_395.html
https://youtu.be/ssniRveILG8
https://marathilivenews.net/?p=28514
https://youtu.be/T4FLXnRQCxI
https://adarshvartahar01.blogspot.com/2023/06/blog-post_31.html
https://shivsattatimes.com/?p=7205
https://vaibhavmohanpatil.blogspot.com/2023/06/blog-post_24.html?m=1
Comments
Post a Comment