ही महानगरपालिकेची जबाबदारी

पावसाळ्यात मॅनहोल्समध्ये पडून मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वी अनेकदा मुंबई व उपनगरांत घडलेल्या आहेत. मुसळधार पावसात रस्ते व गटारे तुडुंब भरून वाहत असल्याकारणाने उघड्या मॅनहोलचा अंदाज न आल्याने अनेक नागरिक, जनावरे अपघातग्रस्त होतात तर अनेकांचा नाहक जीव जातो. बऱ्याचदा अशा प्रकारच्या मॅनहोल्सवरील झाकणे तुटलेल्या अवस्थेत असतात. अनेक ठिकाणी तर झाकणेच नसतात. दुरुस्तीच्या नावाखाली मॅनहोल्सवरील काढण्यात आलेल्या जाळ्या पुन्हा बसवण्याची तसदी घेतली जात नाही. त्याची योग्य देखभाल दुरुस्ती करणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. संबंधित प्रभाग कार्यालयाच्या नजरेस अशी ठिकाणी त्वरित यायला हवीत. मात्र पावसाळा सुरू होवुनदेखील या बाबतीत उदासीनता दिसून येत आहे. शहरांतर्गत रस्ते आज चकाचक होत आहेत मात्र उघडी गटारे व मॅनहोलच्या बाबतीत तितकेसे गांभीर्याने घेतले जात नाही. पावसाळ्यात होणाऱ्या अपघातांना रस्त्यांबरोबरच ही उघडी गटारेदेखील जबाबदार आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने मृत्यूचा सापळा बनलेल्या ह्या मॅनहोल्सवर संरक्षक जाळ्या बसवण्याची कामे तातडीने पूर्ण करावीत. 



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त