शिक्षण व अध्यात्माची सांगड

काटी गावात आषाढीनिमित्त विद्यार्थ्यांची दिंडी
पालघर जिल्ह्यातील काटी गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी काल आषाढी एकादशीनिमित्त गावात पायी दिंडी काढली. शिक्षण व आधुनिकतेच्या जगात अध्यात्माची ही सांगड पालक व ग्रामस्थांना सुखावणारी ठरली. विद्यार्थ्यांच्या दिंडी निमित्त सर्व  गावात आनंदाचे वातावरण दिसून आले. गावातील शाळा 100% प्रगत असून शाळेत सातत्याने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित केले जातात. आषाढी एकादशी निमित्त केंद्र प्रमुख रमेश चव्हाण सर, मुख्याध्यापक जाधव सर यांची संकल्पना आणि प्रविण बडे सर यांच्या निजोजनातून दिंडी पार पडली. गावातून सर्व ग्रामस्थांनी दिलेला उत्स्पूर्त प्रतिसाद उल्लेखनीय होता. गावात ठिकठिकाणी या विद्यार्थी दिंडीचे स्वागत करण्यात आले. 


वैभव पाटील 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त