आषाढीची वारी, आली पंढरीच्या दारी - कविता

आषाढीची वारी, आली पंढरीच्या दारी
आषाढीची वारी, आली पंढरीच्या दारी | 
पाहता माऊली, सुखावले वारकरी ||

दिंडी चालतसे वाटेने, ओढ असे ती पंढरी |
तृप्त झाले मन, पाय लागे चंद्रभागातिरी ||

आषाढीचा सण मोठा, चाले संतांच्या संगती |
वारीचा देखणा सोहळा, शिण देहाचा हरती ||

नाही कमी कुठे पडती, सर्व सोयी वारी मिळती | 
आजाराला नाही थारा, औषधोपचार जागोजागी ||

रिंगणाचा तो सोहळा, नाही कुठे दिसे जगी |
माझ्या विठुरायाच्या चरणी, सर्व सुखे सदा उभी ||

चंद्रभागेच्या त्या तीरी, सर्व विघ्ने विसरती |
रखुमाईच्या मंदिरी, मन शांत चित्त होई ||

वारीच्या ऊर्जेने, फिरता जड पावली |
पुन्हा धाव घेऊ, मनी ठेवू विठू माऊली ||

शासनाच्या सोयी भारी, स्वच्छ निरोगी पंढरी | 
वारकरी उपचार घेती, महा आरोग्य शिबिरी ||

पंढरीचा हा सोहळा, आहे जगात वेगळा |
एकदा तरी अनुभवा, संत भेटीचा हा मेळा ||


*वैभव मोहन पाटील*

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त