मुंबईजवळच्या बेटाची इतकी दुरवस्था का?
घारापुरी हे बेट शेकडो ग्रामस्थांचे हक्काचे गाव असून आज ते पर्यटनाच्या दृष्टीनेदेखील एक महत्वपूर्ण स्थळ बनले आहे. गेट वे ऑफ इंडिया वरून या ठिकाणी जाण्यासाठी बोटींची सुविधा असून दररोज हजारो पर्यटक येथे एलिफंटा लेणी पाहण्यासाठी भेट देत असतात. त्यामुळे अनेकांच्या उपजीविकेचे ठिकाणदेखील हे बेट बनलेले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली मात्र मुंबई व नवी मुंबईसारख्या शहरांपासून हाकेच्या अंतरावरील ह्या लोकवस्तीपर्यंत नीट विजदेखील पोहोचू शकत नसेल तर येथील ग्रामस्थांचे दुसरे दुर्दैव ते काय? ७० वर्षे या ठिकाणी वीजच नव्हती. २०१८ साली पोहोचवण्यात आलेली वीज पाच वर्षेदेखील देखभालीअभावी टिकू शकलेली नाही. या बेटाला युनेस्कोचा जागतिक दर्जा लाभलेला आहे मात्र तिथपर्यंत विजेसारखी मूलभूत बाबदेखील पोहोचू शकत नसेल तर काय म्हणावे इथल्या व्यवस्थेला?
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
Comments
Post a Comment