ईडी तपासाचे पुढे काय होते?

मागील काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील अनेक नेत्यांची ईडी चौकशी करण्यात आली. अनेक नेते अजूनही चौकशीच्या फेऱ्यात आहेत. अनधिकृत कामे, कमाईपेक्षा अधिक संपत्ती जमवणे, सार्वजनिक कामांमध्ये घोटाळे यासाठी ह्या चौकश्या करण्यात येत आहेत. मात्र ह्या चौकश्यांचे पुढे काय होते हे नंतर कळतच नाही. प्रसारमाध्यमेही ठराविक पाठपुराव्यांतर विषय संपवून टाकतात. त्यामुळे ईडीसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया केवळ राजकीय सोयीसाठीच केल्या जातात का असाही संशय घेण्यास वाव निर्माण होतो. पाठपुरावा करणारे तक्रारकर्ते व बातम्या प्रकाशित करणारी माध्यमे ठराविक काळानंतर अचानक विषयातून एक्झिट घेताना दिसत आहेत. त्यामुळे आपली विश्वासार्हता टिकवण्यासाठी आता ईडीनेच आपल्या कारवायांच्या सत्य व सद्यस्थितीची माहिती देणारी श्वेतपत्रिका काढावी. 



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त