लोकांना गरजेच्या वस्तू परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणे महत्त्वाचे

महाराष्ट्रातील राजकारणाचा पुरता खेळखंडोबा झाला आहे. विधानसभा निवडणुकांना जेमतेम एक वर्ष बाकी असताना कित्येक वर्षांची परंपरा असलेले राजकीय पक्ष फोडून होत असलेली सत्तांतरे अनाकलनीय आहेत. आत्मसन्मान, तत्व व निष्ठेशी एव्हढी प्रतारणा अनेक दशकांमध्ये प्रथमच होताना दिसत आहे. सत्तेच्या मोहात सुरू असलेला हा खेळखंडोबा राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारा आहे. एकीकडे महागाई कमी करण्यासाठी कोणतेही ठोस नियोजन नाही, रस्ते अपघातांमधे दररोज शेकडो जीव जात असताना दुसरीकडे सत्तालोभाने जनतेचे प्रश्न दुर्लक्षित होताना दिसत आहेत. भाज्यांचे भाव गगनाला भिडलेले असताना तामिळनाडू सरकारच्या धर्तीवर भाज्यांची विक्री रेशन दुकानांमध्ये स्वस्त दराने करून शेतकरी व नागरिकांनाही दिलासा देण्याचे पाऊल सरकारने उचलावे. शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला तर उत्पादनही नक्कीच वाढेल. तसेच मागणी व पूरवठ्यावर सरकारी नियंत्रणदेखील राहील. सरकार कोणतेही असो, कितीही राजकीय पक्षांचे बनलेले असो, लोकांचे प्रश्न सुटणे व त्यांना गरजेच्या वस्तू परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणे राज्यहिताचे आहे. 



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त