जुगाराला प्रोत्साहन देणाऱ्या जाहिरातींवर बंदी हवीच

सोशल मीडियावर आजकाल विविध माध्यमांतून जुगारातून मिळणाऱ्या लाभाच्या जाहिराती सुरू आहेत. या जाहिराती करण्यात काही सिनेकलावंत, खेळाडू व इतर सेलिब्रेटी आघाडीवर आहेत. रमी, लॉटरी यासारख्या जुगारसाम्य खेळांतून फायदा झाल्याचे सांगणारी काही उदाहरणेदेखील वारंवार अशा जाहीरातींतून दिली जातात. मात्र लोकमान्यता मिळालेल्या व प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या कलाकार, खेळाडू अशा जाहिरातींमध्ये काम करून जुगाराला प्रोत्साहन देणार असतील ते अयोग्य आहे. वास्तविक अशा लोकांना लोक आपला आदर्श मानतात. त्यांनीच जुगाराच्या माध्यमातून लोकांना देशोधडीला लावण्याचा अट्टाहास केवळ जाहिरातींतून मिळणाऱ्या पैशासाठी चालवला तर त्याचे विपरीत परिणाम समाजावर होतील. मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर खेळाच्या मैदानातून निवृत्त झाला असला तरी आयपीएल व विविध उपक्रमांतून तो नेहमीच लोकांसमोर येत असतो. मात्र सध्या तो पेटीएम फर्स्टच्या जाहिरातीतून दिसतोय. सचिन तेंडुलकर भारतरत्न आहे. त्यांचे देशासह जगभरात असंख्य चाहते आहेत. त्यामुळे भारतरत्न असणार्‍या व्यक्तिने पेटीएम फर्स्ट सारख्या जुगार चालवणार्‍या अ‍ॅपची जाहीरात करणे योग्य नाही. आमदार बच्चू कडू यांनी त्यावर बंदी घालण्याचे आवाहन केले आहे जे रास्तच आहे. पेटीएम फर्स्टमधून रम्मी सारखे गेम ओपन होतात. अशातून लोकांची फसवणूक झाल्याच्या तसेच काहींनी आत्महत्या केल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. या कारणांमुळेच आंध्र प्रदेश,आसाम, अरुणाचल प्रदेश, तेलंगणामध्ये या गेमला बंदी आहे. असे असताना सचिनने किंवा कुठल्याही नामांकित व्यक्तीने अशा जाहिरातीतून लोकांना जुगारास प्रोत्साहन देणारे खेळ खेळण्याचे आवाहन करणे उचित नाही. तसेच अशा जाहिरातींवर बंदी आणायला हवी.



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त