केसीराव यांचा खटाटोप कशासाठी?

बीआरएसचे नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या एंन्ट्रीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पंढरपुरला विठ्ठलदर्शनानिमित्ताने आलेल्या चंद्रशेखर राव यांनी मोठं शक्तिप्रदर्शन केले. तसेच बीआरएस महाराष्ट्रात सर्व निवडणुका लढवणार असल्याची मोठी घोषणादेखील त्‍यांनी केली आहे. त्‍यांच्‍या या घोषणेमुळे आधीच बिघडत चाललेली महाराष्ट्रातील राजकीय परिस्‍थीती आणखीच बिघडणार आहे. वास्‍ताविक के सी राव हे संघर्षातुन पुढे आलेले नेतृत्‍व आहे. त्‍यांच्‍या नेतृत्‍वकौशल्‍याच्‍या बाबतीत शंका घेण्‍याचे कारण नाही. मात्र त्‍यांनी महाराष्‍ट्रासारख्‍या पुरोगामी व राजकीय प्रतिभासंप्‍पन्‍न राज्‍यात हातपाय पसरवणे संयुक्‍तीक ठरत नाही. महाराष्‍ट्रातील अस्थिरतेचा फायदा उचलण्‍याचा ते प्रयत्‍न करणार असतील तर महाराष्‍ट्रातील सर्वपक्षीय नेते त्‍यांच्‍याविरोधात रान उठवतील यात शंका नाही. त्‍यांच्‍या तेलंगणा मॉडेलची भांडाफोड करणा-या अनेक गोष्‍टी राज्‍यातील नेत्‍यांकडे आहेत. त्‍यात त्‍यांचे ग्रामविकासाचे फसलेले धोरण, सरपंचांची नाराजी, केंद्राचा पंचायत राज निधी इतर कामांसाठी वळवण्‍याचा प्रकार या बाबी त्‍यांना अडचणीत आणणा-या आहेत. त्‍यामुळे महाराष्‍ट्रात त्‍यांचा पक्षविस्‍ताराचा सुरु असलेला खटाटोप राज्‍यातील कुठल्‍या पक्षाला फायदेशीर ठरणारा आहे याचे उत्‍तर मिळाल्‍यास ब-याच गोष्‍टी स्‍पष्‍ट होतील.   

वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त