वारी प्रश्नमंजुषा विजेत्यांचा सार्थ ज्ञानेश्वरी आणि तुळशीमाळ देऊन सन्मान
पालघर जिल्ह्यातील देवघर वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आषाढी वारी कालावधीत घेण्यात आलेल्या ऑनलाईन वारी प्रश्नमंजुषेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. आळंदी येथील प्रसिद्ध कीर्तनकार देवघरवासी हभप पांडुरंग महाराज भोईर यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या ह्या स्पर्धेतील विजेत्यांचा घरी जाऊन त्यांचा सार्थ ज्ञानेश्वरी आणि तुळशीमाळ देऊन सन्मान करण्यात आला. ठाणे पालघर जिल्ह्यातील अनेक परमार्थ प्रेमींनी ह्या ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. आषाढी एकादशी पर्यंत विचारण्यात आलेल्या वारीविषयक प्रश्नांवर बहुतांश स्पर्धकांनी अचूक उत्तरे दिली मात्र सर्वात आधी उत्तर देणाऱ्या स्पर्धकांची नावे विजेतेपदासाठी विचारात घेण्यात आली. निकालानंतर सौ.प्रतिभा पष्टे, डोंगस्ते,पालघर, श्रीमती प्रभावती पाटील घणसोली, नवी मुंबई, सौ. पुनम खेडकर, पुणे यांनी विजेतेपद मिळवले. विजेत्यांना घरपोच ज्ञानेश्वरी आणि तुळशीमाळ भेट देऊन सन्मान करण्यात आला. हभप पांडुरंग भोईर यांनी स्वतः विजेत्यांचा सन्मान केला. नोकरी करत असताना अनेक वेळा मला माझ्या उत्कृष्ट कामाबद्दल तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर पूरस्कार मिळाले परंतू आज आपणा कडून ज्ञानेश्वरी भेट घेतली हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा पुरस्कार मिळालेला आहे असे मत डोंगस्ते येथील प्रश्नमंजुषा विजेत्या सौ प्रतिभा पष्टे यांनी व्यक्त केले. पंढरपूरच्या वारीबद्दल ज्ञानात भर पडून त्या माध्यमातून परमार्थाचा प्रसार व्हावा या हेतूने हभप पांडुरंग भोईर वारी कालावधीत दरवर्षी अशी स्पर्धा आयोजित करत असतात. त्यांच्या ह्या उपक्रमाचे परमार्थ प्रेमींकडून कौतुक करण्यात येत आहे.
वैभव पाटील
*वारी प्रश्नमंजुषामध्ये सहभागी झालेले भाविक*
*सौ.मीना पाटील वाशिंद.ठाणे.*
*सौ.प्रज्ञा झिंझाळ खानिवली.पालघर.*
*सौ.सुलभा शेळके सिंहगड.पुणे.*
*सौ.जयश्री वारघडे अंबाडी.ठाणे.*
*श्री.मोहन ठाकरे वज्रेश्वरी.ठाणे.*
*श्री.ज्ञानेश्वर रसाळ कुडे.पालघर.*
*सौ.सुरेखा लोहार.आळंदी.*
*कु. धृव पटवर्धन.सातारा.*
*सौ.अर्चना दहिफळे.आळंदी.*
*सौ.भगवती पाटील जामघर.पालघर.*
*कु.तनुज पाश्चापूर.ठाणे.*
*श्रीमती.विद्या बावस्कर निगडी.पुणे.*
*सौ.कृपाशी डोंगरे बोईसर.पालघर.*
*पालसकर मॅडम डोंबिवली.मुंबई.*
*श्री.मोहन पाटील अंबाडी.ठाणे.*
*सौ.सुप्रिया मुंढे आळंदी.*
*सौ.मानसी पाटील खानिवली.पालघर.*
*श्री.मंदार पाटील असनस.पालघर.*
*सौ.राधा काळे.आळंदी.*
*श्री.प्रितेश पटेल कुडूस.पालघर न्युज.*
*कु.वेदांत पाटील मालोंडे.पालघर.*
*श्री.सुधीर को-हाळे येवला.नाशिक.*
*आपण सर्वांनी यथायोग्य उत्तरे देऊन आमच्या ज्ञानात भर घातली आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद.*
*भाग्यवान विजेते.*
*सौ.प्रतिभा पष्टे डोंगस्ते.पालघर.*
*श्रीमती.प्रभावती पाटील घनसोली.नवी मुंबई.*
*सौ.पुनम खेडकर च-होली.पुणे.*
*राम कृष्ण हरि* 🚩👏🏻
Comments
Post a Comment