शैक्षणिक पाया मजबूत होण्यासाठी मूल्यमापन गरजेचे

गेल्‍या काही वर्षांपासुन प्राथमिक शिक्षणात मुल्‍यमापनापासुन सुट देण्‍यात आलेली होती. त्‍यानुसार आठवीपर्यंतच्‍या मुलांना सरसकट उत्‍तीर्ण करण्‍याचे सरकारचे धोरण होते. मात्र यामुळे अभ्‍यास व परिक्षांच्‍या टेन्‍शनपासुन मुले व शाळा ब-यापैकी बिनधास्‍त झाल्‍याचे पाहायला मिळत होते. आता नव्‍या धोरणानुसार पाचवी ते आठवीपर्यंतच्‍या विदयार्थ्‍यांना परिक्षा देऊन उत्‍तीर्ण व्‍हावे लागणार आहे. त्‍यामुळे सरसकट सर्वच मुले आज पुढच्‍या वर्गात उन्‍नत करण्‍याची पध्‍दत बंद होणार आहे. कोरोना प्रादुर्भावाच्‍या पार्श्‍वभुमीवर गेल्‍या दोन वर्षांपुर्वी शैक्षणिक वर्षांपासुन शाळा व परिक्षा नसल्‍यातच जमा होत्‍या. त्‍यामुळे ना मुलांची शिकवणी सुरु ना परिक्षा अशी विदारक परिस्‍थीती होती. अशा परिस्‍थीतीत मुलांचे न भरुन येणारे नुकसान झाले आहे. वास्‍ताविक शैक्षणिक जगतात सुरु असलेला हा सावळागोंधळ विदयार्थ्‍यांचे शैक्षणिक आयुष्‍य कमजोर करणारा होता. आता परीस्‍थीती पुर्वपदावर येत आहे. परिक्षा हा मुलांच्‍या शैक्षणिक आयुष्‍यातील अविभाज्‍य भाग आहे. त्‍यामुळे मुलांचा शैक्षणिक पाया मजबुत होणेसाठी त्‍यांचे मुल्‍यमापन हे अनिवार्य बाब आहे. त्‍यामुळे परिक्षा पध्‍दत नियमित व काटेकोरपणे राबविणे मुलांना स्‍पर्धेच्‍या युगात टिकाव धरण्‍यासाठी अत्‍यंत आवश्‍यक आहे.


वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई


Comments

Popular posts from this blog

असा किर्ती कुमार न होणे

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर