आरोग्य विभागातील प्रशासकीय अधिकारी सौ सुवर्णा मुरंजन सेवानिवृत्त

सौ सुवर्णा मुरंजन, प्रशासकीय अधिकारी, आरोग्य सेवा
आरोग्य सेवा आयुक्तालयात प्रशासकीय अधिकारी पदावर कार्यरत असणाऱ्या एक उत्तम, अभ्यासू अधिकारी सौ सुवर्णा मुरंजन ह्यादेखील ३७ वर्षाहून अधिक काळ शासकीय सेवा बजावून सेवानिवृत्त झाल्या. राज्यातील विविध आरोग्य संस्थांमध्ये कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आस्थापनाविषयक बाबींमध्ये त्यांचा हातखंडा होता. त्यांच्यावर सोपवलेल्या कुठल्याही विषयाची माहिती त्यांच्याकडे तात्काळ उपलब्ध असायची. शासन निर्णय, नियम, कार्यप्रणाली, मार्गदर्शिका यांबाबत त्यांना खडानखडा माहिती असल्यामुळे मा आयुक्त सरदेखील त्यांचा उल्लेख 'एनसायक्लोपीडिया' म्हणून करायचे. सहकारी व वरिष्ठांशी त्यांचे अत्यंत कणखर, हजरजबाबी, ठाम परंतु सौहार्दपूर्ण संभाषण त्यांच्यातील एका जबाबदार अधिकाऱ्याची जाणीव करून देणारे होते. मलादेखील कामकाजात उद्भवणाऱ्या अनेक अडचणींवर त्यांचेकडे तात्काळ सल्ला व मार्ग उपलब्ध असायचा. त्यांच्याशी बोलताना सदैव सकारात्मकता जाणवायची. हवी असलेली माहिती तात्काळ व अपेक्षेपेक्षा कमी कालवधीत उपलब्ध करून देणाऱ्या अधिकारी म्हणून मी मुरंजन मॅडमचा उल्लेख करीन. कामकाजात जितक्या त्या कर्तव्यदक्ष होत्या तितक्याच त्या कुटुंबवत्सल देखील आहेत. कामाव्यतिरिक्त विविध सामाजिक विषयांवर त्यांच्यासोबत गप्पा मारताना कामाचा ताण हलका झाल्यासारखे वाटायचे. त्यांच्या निवृत्तीने कार्यालय व आस्थापना विभागात अनुभवी व अभ्यासू अधिकाऱ्याची उणीव निश्चितच जाणवत राहील. 

वैभव

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त