अशा कर्ज बुडव्यांचे काय ?
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
सामान्य माणूस हा आपली प्रतिष्ठा जपत असतो. प्रसंगी पोटाला चिमटे काढून तो घर, उद्योग व्यवसाय, वाहनासाठी घेतलेले कर्ज फेडत असतो. एखादा हप्ता भरता न आल्यास पैसे हातात आल्यावर मात्र व्याजासकट बँकेच्या कर्जाची परतफेड करत असतो. कर्ज न चुकवल्याने घरापर्यंत बँकांचे प्रतिनिधी येणे ही त्याच्यासाठी सर्वात नामुष्कीची घटना असते. याच ओझ्याने अनेकांनी आपले आयुष्य संपवल्याची अनेक उदाहरणे देता येतील. सामान्यांबरोबरच अनेक सेलिब्रिटीजदेखील हे ओझे सहन करू शकत नाहीत. यामुळेच नुकतेच कला दिग्दर्शक नितीन देसाई, अभिनेते रवींद्र महाजनी यांनी मृत्यूच्या पाशात जात आपली सुटका करून घेतली. मात्र हजारो, शेकडो कोटी रुपयांची कर्जे घेऊन ती न फेडता परदेशात पळून जात एशोआरामाचे जीवन जगणारे अनेक महाभागही आपल्या देशात राहून गेलेत. भारतीय बँकांचे नऊ हजार नऊशे कोटी बुडवणारा विजय मल्ल्या, १३ हजार कोटी बुडवणारा निरव मोदी, ३६ हजार कोटींचा घोटाळा करणारा नीरज सिंघल, ललित मोदी, मेहुल चोकसी अशी अनेक नावे घेता येतील. त्यामुळे गर्भश्रीमंत व्यक्तीच बँक घोटाळे करून कर्जे बुडवू शकते हे वारंवार अधोरेखित होत आहे. कर्जाच्या बाबत सामान्यांना प्रतिष्ठेची काळजी तर प्रतिष्ठीत मात्र बेफिकीर अशी अवस्था आज समाजात आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment