अभ्यासू व्यक्तिमत्त्व हरपले

जेष्ठ साहित्यिक, विचारवंत, इतिहास संशोधक प्रा. हरी नरके यांचे ९ ऑगस्ट रोजी वयाच्‍या ६०व्‍या वर्षी दीर्घ आजारानं निधन झाले. विचारवंत, लेखक, मालिका निर्माते, ब्लॉगर म्हणून ते महाराष्ट्राला परिचित होते. समतेच्या लढाईतील एक कणखर संवेदनशील माणूस काळाच्या पडद्याआड गेला आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्‍या विचारांचा वारसा जपणारा एक उत्‍तम वक्‍ता म्‍हणून त्‍यांची ओळख होती. पुण्‍यातील विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करणारे प्रा. नरके हे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्यदेखील होते. महात्मा फुले यांच्‍यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच  सामाजिक चळवळींवर त्‍यांचा सखोल अभ्‍यास होता. महात्‍मा फुले यांच्‍यावरील विपूल साहित्‍यासह हिंदी, मराठी इंग्रजी भाषेत त्यांचे ३७ ग्रंथ प्रकाशित झाले. विविध वर्तमानपत्रांमध्‍येदेखील त्‍यांनी साहित्‍यलेखन केले. अनेक सामाजिक विषयांवर त्‍यांनी थेट भाष्य केले होतं. समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी ओबीसी प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांना अनेकदा धारेवर धरलं होतं. त्यांच्या निधनामुळे संशोधन, सामाजिक क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व हरपले आहे.


वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई


Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त