कथानक आटोपशीर असावे
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
'प्रतिशोध - झुंज अस्तित्वाची' ही सोनी मराठीवरील मालिका तृतीयपंथी व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीय यांना भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यांच्या जीवनाचे अनेक पैलू उलगडणारी आहे. तृतीयपंथी म्हणून वावरणारी ममता आणि तिची मुलगी दिशा यांचा समाजातील बदलाचा प्रेरणादायी प्रवास या मालिकेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. मालिकेतील सर्वच कलाकारांचा अभिनय दर्जेदार आहे. मात्र तृतीयपंथीय पात्राच्या सभोवताली फिरत असलेल्या ह्या मालिकेला गुन्हेगारी आणि थराराचा मुलामा चढवताना मालिका काहीशी गुंतागुंतीची व रटाळ होत असल्याचा भास होतो. एक दुर्लक्षित व गंभीर सामाजिक समस्येला टीव्ही मालिकेच्या माध्यमातून दाखवताना तिला गुन्हेगारीचा रंग देऊन वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न प्रेक्षकांना गृहीत धरणारा आहे. मालिकेच्या कथानकातील अनपेक्षित वळणे आणि घडणारे गुन्हे मालिकेला मूळ आशयापासून दूर नेणारे आहेत. त्यामुळे मालिकेचे कथानक आटोपशीर असायला हवे असे वाटते.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment