सामाजिक परिवर्तन गरजेचे

महिला व मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण देशात अत्यन्त धक्कादायक आहे. याची अनेक कारणे देत येतील. अनेक कुटुंबांमध्ये वैचारिक मतभेद, अवास्तव इच्छा अपेक्षा आणि इतर कारणांवरून लहान-मोठे वाद होत असतात. परंतु अशा परिस्थितीत रागाच्या भरात परिवाराला सोडून जाण्याच्या घटना वाढत आहेत. अनेक लहान मोठ्या कारणांवरून पती-पत्‍नीतील वाद विकोपाला जातात व टोकाची भूमिका घेतली जाते. नवऱ्याच्‍या त्रासाला कंटाळून अनेक महिला घर सोडून निघून जातात. तरुण-तरुणी प्रेमात कुटुंबीयांचा अडसर होत असेल, तर थेट पळून जाण्‍याचा निर्णय घेतात. मोठमोठी आश्वासने  देऊन तरुणी किंवा महिलांना पळवून नेण्‍याच्‍या घटना वाढल्‍या आहेत. फूस लावून पळवून नेण्‍याचे प्रमाण तरूण मुलींमध्‍ये अधिक आहे. हरविल्‍यानंतर पोलिसांकडून संबंधित महिला, मुलींचा शोध घेतला जातो मात्र अनेकदा महिलेचा पत्‍ता हुडकून काढणे कठीण होते. १८ वर्षांवरील अनेक मुली, महिला स्‍वयंमर्जीने घर सोडून गेल्याने त्‍या घरी परतण्‍यास नकारही देतात. सुमारे पन्‍नास टक्‍के महिला घरी परतण्‍याची आकडेवारी समोर आली असली, तरी मानवी वाहतुकीचा विषय गंभीर असून अनेक महिलांना लैंगिक छळ सहन कराव लागतो. महिलांचे घर सोडून जाण्‍याच्‍या घटनांमध्‍ये अनेक कारणे असली, तरी पुरुषी मक्‍तेदारी हे प्रमुख कारणांपैकी एक आहे. अनैतिक उद्देशाने पळवून नेलेल्या महिलांचा शोध घेण्‍यासाठी पोलीस यंत्रणेने स्‍वतंत्र पथक नेमण्‍याची व त्यासाठी हेल्पलाईन नंबर सुरू करण्याची आवश्यकता आहे. देशात २०१९ ते २०२१ या तीन वर्षांत तब्बल १३ लाखापेक्षा जास्त महिला बेपत्ता झाल्याची आकडेवारी विषयाची दाहकता दाखवते. यात मध्य प्रदेश सर्वात पुढे असले तरी महाराष्ट्रही तिसऱ्या स्थानावर आहे ही गंभीर बाब आहे. भविष्यात हे प्रमाण कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना व सामाजिक परिवर्तन गरजेचे आहे.


वैभव मोहन पाटील
घणसोली,  नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

असा किर्ती कुमार न होणे

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर