प्रतीक्षा ऐरोली नाट्यगृहाची

नवी मुंबईतील नाट्यरसिकांसाठी वाशी अथवा ठाणे हे दोनच पर्याय सध्या उपलब्ध आहेत. नवी मुंबईची वाढती लोकसंख्या व विविध सामाजिक, राजकीय उपक्रम यांमुळे वाशी येथील नाट्यगृह अपुरे पडत आहे. तसेच दिघा, ऐरोली भागातील नाट्यप्रेमींना ठाणे व वाशीतील नाट्यगृहे काही प्रमाणात गौरसोयीची आहेत. यासाठी १२ वर्षांपूर्वी नवी मुंबई महापालिकेने पुढाकार घेऊन ऐरोलीमध्ये नाट्यगृह उभारण्याचा निर्णय घेतला. नाट्यगृहाच्या कामाला सुरुवातही झाली. मात्र प्रशासकीय दिरंगाई आणि कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणामुळे नाट्यगृहाचे काम सुरू होऊन थांबले. दहा वर्षांनंतर मागील वर्षी पुन्हा नाट्यगृहाच्या उभारणीला पुन्हा सुरुवात झाली. मात्र तरीदेखील हे काम अत्यंत संथगतीनेच सुरू आहे. सुरुवातीला या नाट्यगृहासाठी असणारा ३५ कोटी रुपयांचा अपेक्षित खर्च आता जवळपास ७० कोटींवर गेला आहे. ऐरोलीत सेक्टर ५ मध्ये सिडकोकडून भूखंड घेऊन २०१४-१५ साली सुरू झालेले व रखडलेले या नाट्यगृहाचे बांधकाम मागील सप्टेंबर महिन्यात पुन्हा सुरू झाले आहे. आतापर्यंत नाट्यगृहाच्या इमारतीचे दोन स्लॅब उभारून झाले आहेत. तीन मजली इमारतीचे ८६० आसनक्षमता असलेले हे नाट्यगृह अत्याधुनिक सुविधायुक्त असणार आहे. वाशीनंतर ऐरोलीकडे शहरातील सांस्कृतिक केंद्र म्हणून पाहीले जाते. ऐरोलीतील रसिकांबरोबरच मुलुंड, भांडुप, विक्रोळी आणि ठाणे परिसरातील नागरिकांनाही या नाट्यगृहामुळे चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आता कुठलेही विघ्न न येता ह्या नाट्यगृहाचे काम ठरलेल्या वेळेत पूर्ण होईल व नवी मुंबईच्या नाट्यरसिकांना हक्काचे नाट्यगृह उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. 



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

असा किर्ती कुमार न होणे

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर