या महामार्गांना समांतर रेल्वे सेवा सुरू करा

भरमसाठ संख्‍येतील वाहने, रस्‍त्‍यांवरील खड्डे, रस्त्यांची सुरु असणारी कामे, अपघातग्रस्‍त व  बंद पडणारी अवजड वाहने यामुळे मुंबई- नाशिक आणि मुंबई -अहमदाबाद या महामार्गांवर वाहतुकीचा खोळंबा नेहमीचाच झालेला आहे. तासाभराच्‍या अंतरासाठी तीन-चार तासांचा कालावधी लागत आहे. त्‍यामुळे या मार्गांवरुन प्रवास करणे प्रवाशांच्‍या दृष्‍टीने अत्‍यंत तापदायक झालेले आहे. या मार्गांवरून गुजरात तसेच उरण येथील जेएनपीए बंदरातून अवजड वाहनांची वाहतूक करणा-या वाहनांची संख्‍या प्रचंड असते. त्‍यातच नाशिक महामार्गावर रस्त्याचे रुंदीकरण तसेच दुरुस्तीचे काम हाती घेण्‍यात आलेले आहे. या मार्गावरुन माणकोली नाका तसेच कल्‍याण व भिवंडी येथे नियमित प्रवास करणा-या खाजगी वाहनांची भरमसाठ संख्‍या पाहता या मार्गाला समांतर अशी रेल्‍वेसेवा किंवा मेट्रो सुरु करण्‍याचा विचार भविष्‍यात करायला हरकत नाही. थेट समृध्‍दी महामार्गाला जोडणा-या या रस्‍त्‍यावर येत्‍या काही वर्षांत वाहनांची संख्‍या प्रचंड वाढणार आहे. यात होणा-या वाहतूक कोंडीत मुंबई ठाण्‍याला जोडणा-या लगतच्‍या परिसरातील नागरीकांना होणारा त्रास पाहता त्‍यांना या महामार्गाला समांतर अशी रेल्‍वे सेवा अथवा मेट्रो रेल उपलब्‍ध करुन दिल्‍यास वाहतूक कोंडीतून प्रवाशांची काही प्रमाणात तरी सुटका होईल.



वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई


Comments

Popular posts from this blog

असा किर्ती कुमार न होणे

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर