सण दिवाळीचा

सण दिवाळीचा

दिवाळीची चाहूल
आनंदाची लहर 
घराघरांत येई
हर्षाचा मोहर

लक्ष्मीच्या पावलांनी
कुटुंब सुखावते
गोडधोड पदार्थांनी
घर प्रसन्न होते

बच्चेकंपनीची धमाल
जेष्ठांचीही साथ
दिवाळीची गंमत
करू एक साथ 

लक्ष्मीपूजनाची तयारी
पाने फुलांनी सजवू
चला साकडे देवीला 
समाधानासाठी घालू 

धनत्रयोदशीची आरास 
मनी घेऊनीया ध्यास
सुखसंपन्नता नांदो अन
राहो लक्ष्मीचा वास 

नरकचतुर्दशी ते भाऊबीज
दिन दिवाळीच्या उत्सवी
आनंदाची वाट जावो
देवा सर्वांच्या त्या दारी


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

असा किर्ती कुमार न होणे

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा