नभ रंग दिवाळी अंक

*मरावे परी अवयवरुपी उरावे*

मना मानवा तू, मनाचे सुनावे । मरावे परी, अवयवरुपी उरावे ।।

जगी श्रेष्ठ दान, असे रक्तदान । परि सर्वश्रेष्ठ, अवयव दान ।।
दानाकडून जाऊ, कृतज्ञतेकडे । अवयवदानाने, मन समृद्धीकडे ।।

एक एक अवयव, मिळे गरजवंता । पीडा हरी मिळे, आशीर्वाद दाता ।।
निकामी अवयव, त्यासी पुसावे । महत्व अवयवांचे, जनासी कळावे ।।

मानवी जीव असे, लाख लाख मोला । मिळे अवयवदाने, हर्ष पुनर्जन्माचा ।।
कायदा आला, अवयव प्रत्यारोपणाचा । कायद्याने करा, संकल्प अवयवदानाचा ।।

जिवंत पणी असो की, मृत्यू अखेर । दान सख्ख्या नात्यांत, नको बाहेर ।।
लिव्हर, फुफ्फुस, स्वादुपिंड, मूत्रपिंड । जिवंतपणी होते या, अवयवांचे दान ।।

नेत्र, त्वचा अन, अस्थींचे दान । करा रे तुम्ही, मृत्यूनंतर दान ।।
रक्ताच्या नात्यातच, होते हे दान । आई-वडील, पती-पत्नी, भाऊ, बहीण ।।

व्यवहार नको ह्या, अवयव दानात । कायद्याने व्हाल, शिक्षेस पात्र ।।
असंख्य रुग्ण असती, दानाच्या प्रतीक्षेत । अवयवदानाने निर्मे, नवजीवन त्यांच्यात ।।

राहा मरणोत्तर, जिवंत जगतात । दान अवयवांचे, सदैव ऋणात ।।
चला जागृतीचा, वसा हाती घेऊ । गैरसमज दानाचे, चला दूर करू ।।

अवयवदान हेच खरे, जीवन दान । जीवनी नवपालवीचे, हेच वहान ।।
दात्याचे ऋण, कसे ते फेडावे । मरावे परी, अवयवरुपी उरावे ।।


वैभव मोहन पाटील

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त