राज्यात स्थानिकांना संधी मिळायला हव्यात
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
मराठा आरक्षणावरून सध्या राज्यभरात रान उठलेय. शिक्षण व नोकरी मिळवण्यासाठी गुणवत्ता असूनही केवळ आरक्षणामुळे मराठा समाजातील गुणवंत मुले इतरांच्या मागे पडतात वा त्यांना आर्थिक सवलती मिळत नाहीत ही बाब कुणालाही नाकारता येणार नाही. मात्र मुळात शिक्षण संस्था व नोकऱ्यांमध्ये राज्यात उपलब्ध होणाऱ्या किती जागा राज्यातील मुलांना मिळतात हा संशोधनाचा विषय ठरेल. भाषावार प्रांतरचनेत महाराष्ट्र हे मराठीबहुल राज्य म्हणून ओळखले जाते. मात्र राज्यात बहुतांश ठिकाणी परप्रांतीयांनी आपले बस्तान बसवल्याचे दिसत असून अनेक व्यवसाय, खाजगी नोकऱ्यांमध्ये त्यांचे प्रस्थ दिसून येईल. आपल्या शैक्षणिक व व्यावसायिक गुणवत्तेच्या आधारे ते विविध क्षेत्रांत यशस्वी होत असतीलही मात्र यामुळे राज्यातील स्थानिक तरुणांच्या अनेक संधी कमी होताना दिसत आहेत हेही तितकेच खरे आहे. त्यामुळे राज्यात उपलब्ध असणाऱ्या सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील शिक्षण, नोकरी व व्यवसायात स्थानिक तरुणांना योग्य प्रमाणात संधी उपलब्ध झाल्यास एक प्रकारचा प्रादेशिक समतोलही राखला जाईल व आरक्षणासारखा गहन विषय इतक्या बारकाईने हाताळण्याची वेळही सरकारवर येणार नाही.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment