सचिन तेंडुलकर व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या पूर्णाकृती पुतळ्याचे गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर अनावरण करण्यात आले. भारतीय क्रिकेटला आंतराष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळवून देणाऱ्या सचिनच्या संपूर्ण कारकिर्दीची साक्ष देणारा हा पुतळा आहे. मुंबईत वानखेडेवर बसवण्यात आलेला हा पुतळा अनेक नवोदित क्रिकेटपटूंना नवस्फूर्ती व प्रेरणा देणारा ठरणार आहे. ६६४ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३४,३५७ धावा करत सचिन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक १०० शतके आणि १६४ अर्धशतके केली आहेत. इतकी शतके ठोकणारा तो एकमेव खेळाडू आहे. एक दिवसीय सामन्यांत १८,४२६ आणि कसोटीत १५,९२१ धावांसह सचिनच्या नावावर दोन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा आहेत. वनडेमध्ये द्विशतक झळकावणारा आणि २०० कसोटी सामने खेळणारा तो पहिला खेळाडू आहे. २०११ मध्ये आयसीसी क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तो भाग आहे. मुंबई इंडियनकडून खेळताना काही काळ त्याने आयपीएल मध्येदेखील कारकीर्द गाजवली. क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम कामगिरी करताना सर्वसाधारण राहणीमान व मराठमोळ्या विचारसरणीमुळे सचिन तेंडुलकर हे नाव आज प्रत्येक मुंबईकराचे आदराचे स्थान आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment