व्यर्थ ठरली दुर्मिळ भेट

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी कॅलिफोर्निया येथील यूएस - चीन शिखर बैठकीनंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा हुकूमशहा असा उल्लेख केला आहे. चिनचे सत्‍ताधीश जिनपिंग यांना हुकुमशहा संबोधुन अमे‍रिकेसारख्‍या महासत्‍तेचे अध्‍यक्ष बायडेन यांनी आपल्‍या बाल बुध्‍दीचे दर्शन घडवले. वास्‍ताविक आज जगात चिन व अमेरीका हे दोन्‍ही देश माहासत्‍ता म्‍हणून ओळखले जातात. युध्‍दजन्‍य परिस्‍थीतीत या दोन देशांचे पाठबळ अत्‍यंत महत्‍वाचे ठरते. त्‍यामुळे या दोन देशांच्‍या प्रमुखांची भेट संपूर्ण जगासाठी उत्‍सुकतेचा विषय ठरते. जगामध्‍ये घडत असलेल्‍या प्रमुख घडामेडी, युक्रेन युध्‍द, गाझा संघर्ष, कोरोनानंतरची परिस्‍थीती, वातावरणातील बदल, जागतिक मंदी, रोजगार यासारख्‍या विषयांवर या दोन सत्‍ताधिशांमध्‍ये चर्चा अपेक्षित होती. मात्र बायडेन यांनी ‘हुकुमशाहीने’चर्चेलाच पुर्णविराम दिला. त्‍या तुलनेत जिनपिंग यांची भूमिका संयमशील वाटली. शीतयुद्ध किंवा कोणत्याच युद्धात चीनला रस नाही, विस्तारवादाचे आमचे धोरण नाही, कोणत्याही देशाच्या प्रगतीच्या आड यायचे नाही ही त्‍यांची भूमिका चीनबाबत पसरत चाललेले दुषित मतप्रवाह संतुलित करणारी आहे. जगाला ‘कोरोना’सारखा आजार देणा-या चीनची रणनिती भल्‍याभल्‍यांना चक्रावणारी ठरली आहे. व्‍यापार, उदयोगात जगभर पसरलेल्‍या चीनवर अनेक देशांचे अर्थकारण अवलंबून आहे. अशा परिस्‍थीतीत जाग‍तिक महासत्‍तेसोबत त्‍यांची दुर्मिळ अशी भेट व्‍यर्थ ठरली असेच म्‍हणावे लागेल.



वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई   

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त