पराभवाने खचू नका, सर्वोक्तृष्ठ खेळ करा !

गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या कामगिरीचा आलेख सातत्याने उंचावत आलेला आहे. यंदाच्या विश्वचषकामध्येदेखील अंतिम सामन्यापर्यंत अपराजित राहिलेल्या भारतीय संघाने न भूतो अशी कामगिरी करून दाखवली. फलंदाजीबरोबरच गोलंदाजीतही खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत अनेक विश्वविक्रम मोडीत काढले. यात प्रामुख्याने विराट कोहलीचे कौतुक करावेच लागेल. कामगिरीतले सातत्य टिकवून ठेवत त्याने विश्वचषक स्पर्धा गाजवली. अंतिम सामन्यात भारताचा झालेला पराभव हा खेळाचाच भाग आहे. गोलंदाजी व क्षेत्ररक्षणात ऑस्ट्रेलियन खेळाडू सरस ठरल्याने त्यांनी विजय संपादन केला. उलट भारतीय खेळाडूंनी क्षेत्ररक्षणात अनेक चुका केल्या. भारतीय संघाच्या धावा रोखण्यात प्रामुख्याने ऑस्ट्रेलियाचे क्षेत्ररक्षण कारणीभूत ठरले. केवळ चांगल्या फलंदाजी व गोलंदाजीनेच सामना जिंकता येत नाही तर क्षेत्ररक्षण व झेल किती महत्वाचे असतात हे या सामन्यातुन पुन्हा दिसून आले. जय पराभव हा खेळाचाच भाग आहे. त्यामुळे सलग १० सामने जिंकल्यानंतर फायनलपर्यंत पोहोचलेल्या मातब्बर संघाकडून ११ व्या सामन्यात पराभूत होणे यात आश्चर्य अजिबात नाही. मात्र विश्वचषक गमावण्याचे दुःख सर्वच भारतीयांना झाले आहे याविषयी दुमत नाही. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच सुरू झालेल्या ट्वेन्टी ट्वेन्टी च्या पाच सामन्यांच्या मालिकेत दमदार पुनरागमन करत पहिल्याच सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला धूळ चाखली आहे. एकंदरीत, पराभवाने खचून न जाता झालेल्या चुका सुधारत सर्वोत्कृष्ट खेळ करत राहणे यातच क्रिकेटचे यश अवलंबून आहे.  



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त