एकाधिकारशाही संपवा
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
मराठी मतांचे विभाजन करून महाराष्ट्रातील कट्टर मराठीवादी पक्षांना सत्तेपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न राज्यात सुरू आहेत. यासाठी राजकीय पक्षांसोबतच मराठी लोकांनादेखील एकमेकांपासून विभागले जात आहे. पक्षांच्या दावेदारीवरून न्यायालयीन लढाया सुरू झाल्यात. राजकीय पक्षांच्या फाळण्यांचे यशस्वी प्रयोग झाल्यानंतर सध्या मराठा - ओबीसी वाद पेटवला जात आहे. वास्तविक, मराठी मतदारांमध्ये फूट पडून त्यांची एकगठ्ठा मते ठराविक राजकीय पक्षाला मिळू नयेत व अमराठी मतदारांचे वर्चस्व राजकीय पटलावर निर्माण व्हावे यासाठी हे उद्योग सुरू असल्याचा संशय येतो. विकासाच्या प्रश्नांवर निवडणुका लढण्याचे सोडून एकमेकांची उणिधुनी काढण्यात राजकीय नेते व्यस्त आहेत. येत्या काळात लोकसभा, विधानसभेबरोबरच अनेक वर्षे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यात उभे राहणाऱ्या उमेदवारांना पक्ष म्हणून नव्हे तर लोकांनी व्यक्ती पाहून मतदान करा. वर्षानुवर्षे चालत आलेली राजकीय पक्षांची एकाधिकारशाही आगामी निवडणुकांमध्ये संपवून सुशिक्षित, प्रामाणिक, पारदर्शक, समाजाप्रती संवेदनशील, अभ्यासू व लोकांच्या प्रश्नांची जाण असणारे लोकप्रतिनिधी निवडून देण्याची खबरदारी नागरिकांनी या येत्या निवडणुकांमध्ये घ्यावी.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment