प्रदूषणाचा विळखा नवी मुंबईलाही

ट्रान्स हार्बर मार्गावर गेल्या काही महिन्यांपासून प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे. सकाळ सायंकाळ ठाण्याहून वाशी व पनवेलच्या दिशेने धावणाऱ्या गाड्या प्रवाशांच्या मोठ्या गर्दीत धावत आहेत. ठाणे बेलापूर पट्ट्यातील मोठमोठ्या आयटी कंपन्या, कारखाने व या परिसरात वाढलेली लोकवस्ती यामुळे या मार्गावरील रहदारी वाढलेली आहे. ठाणे व ऐरोली रेल्वे स्थानकांमध्ये असलेल्या दिघा रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण झालेले आहे. या स्थानकाचा लाभ दिघा व ऐरोली परिसरातील तसेच एमआयडीसीतील मोठया प्रमाणावरील प्रवाशांना होणार आहे. मात्र या स्थानकाला दिलेल्या नावामुळे वाद उद्भवण्याची शक्यता निर्माण झालेली होती. अशातच केंद्राकडून दिघा गाव या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे मात्र स्थानकाचे उद्घाटन कधी होणार याबाबत संभ्रम अजूनही कायम आहे. सन २०१६ मध्ये रेल्वे स्थानकांच्या कामाचे भूमिपूजन झाले. २०१८ मध्ये स्थानकाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली, पण गुगल तसेच महसूलमध्ये नोंद असणाऱ्या दिघे नावाचा फलक प्रस्तावित रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी लावण्यात आल्याने स्थानिकांनी दिघेऐवजी दिघा असे नाव देण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली होती. पण पश्चिम बंगालमधील एका रेल्वे स्थानकाला हेच नाव असल्यामुळे दिघा हे नाव पुन्हा देता येणे शक्य नव्हते. त्यामुळे पुन्हा दिघा रेल्वे स्थानकाच्या नावावरून वाद निर्माण होण्याची शक्यता होती. अखेर राज्य सरकारने दिघा गाव स्थानक नामकरणाचा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्रीय रेल्वे प्रशासनाकडे पाठवला आणि त्यानुसार अखेर दिघा गाव रेल्वे स्थानकाच्या नावावर केंद्राने शिक्कामोर्तब केले असून तसा फलक लावण्यात आला आहे. रेल्वे स्थानकाच्या नावाचा वाद जरी आता मिटला असला, तरी उद्‍घाटनावरून श्रेयवाद सुरू होण्याची शक्यता कायम आहे. या स्थानकाच्या निर्मितीसाठी अनेक पुढाऱ्यांनी प्रयत्न केल्याने त्यांच्यात श्रेयवाद रंगणार हे उघड आहे. दिघा रेल्वे स्थानक ही स्थानिकांची गरज आहे. नावावरून वाद नवी मुंबईला नवे नाहीत. येथील गावांची नावे इथल्या परंपरेची व इतिहासाची ओळख आहेत. त्यामुळे गाव असो की रेल्वे स्थानके, या नावांच्या रुपात गावांचे अस्तित्व टिकून आहे. 



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त