योग्य काळजी घेतल्यास प्रतिबंध शक्य
राज्यात कोरोनाच्या ‘जेएन-१’ या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले आहेत. केरळसह इतर राज्यांत या नव्या प्रकाराचे रुग्ण आढळत असले तरी योग्य काळजी घेतल्यास त्याचा धोका नसल्याने चिंतेचे कारण नाही. ‘जेएन-१’ साठी आरोग्य यंत्रणा सज्ज असून, संशयित रुग्णांच्या चाचण्या वाढविण्याचे, त्यांचे सर्वेक्षण अधिक सक्षम करण्याचे आणि त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश देऊन आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क करण्यात आलेल्या आहेत. कोरोना साथीनंतर गेले काही महिने लोकांमध्ये कमालीचा बिनधास्तपणा आलेला आहे. वास्तविक संसर्गजन्य आजारांचे वाढते प्रमाण पाहता स्वच्छता, मास्क, सोशल डिस्टसिंग या बाबींचा अंगीकार सार्वजनिक ठिकाणी सातत्याने केला गेला पाहिजे. मात्र एखादा नवा व्हेरिएन्ट आल्यानंतर पुन्हा या सगळ्या गोष्टींसाठी सरकारी आवाहन करावे लागते. नवनवे आजार, प्रदूषण, हवेवाटे पसरणाऱ्या व्याधी पाहता सर्वांनी नियमितपणे योग्य काळजी घेतली तर कुठल्याही विषाणूला घाबरण्याची गरज पडणार नाही. प्रसारमाध्यमांनी या नव्या विषाणूबद्दल योग्य व अधिकृत माहिती प्रसारित केल्यास अफवा पसरणार नाहीत.
वैभव मोहन पाटील
घणसोली
Comments
Post a Comment