डॉ प्रसन्ना भोकरे सेवामुक्त

*डॉ प्रसन्ना भोकरे यांची अनपेक्षित एक्झिट*
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कार्यक्रम अधिकारी डॉ प्रसन्ना भोकरे यांनी काल अभियान कार्यालयातून एक्झिट घेतली. बीएचएमएस डिग्री धारण केलेल्या डॉ प्रसन्ना यांनी आपले पदव्युत्तर शिक्षण UK मधून पूर्ण केले. त्यानंतर तेथील नोकरीच्या संधी सोडून ते मुंबईतील अभियान कार्यालयात कार्यक्रम अधिकारी म्हणून रुजू झाले. त्यांनतर त्यांनी शासनाच्या आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रकल्प या उपक्रमात जवळपास १० वर्षे प्रामाणिक व निष्कलंक सेवा बजावली. या दरम्यान त्यांनी १०८ टोल फ्री क्रमांकाच्या रुग्णवाहिका योजनेत आपले योगदान देत राज्यभरातील १०८ रूग्णवाहिकांवर सनियंत्रण व ह्या सेवेची परिणामकारकता वाढवण्यासाठी आपल्या परीने पुरेपूर प्रयत्न केला. १० वर्षांहून अधिक काळ सेवा बजावल्यानंतर उच्च शिक्षित असलेल्या डॉ प्रसन्ना यांनी आपल्या व्यक्तिगत कारणांस्तव सेवेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. काल त्यांना वरिष्ठ अधिकारी व सहकारी वर्गाच्या उपस्थितीत त्यांच्या भावी उज्वल कारकिर्दीसाठी शुभेच्छा देऊन सवयीप्रमाणे पुस्तक भेट देत निरोप दिला.

वैभव

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त