या दौऱ्याने लक्षद्वीपला नवी ओळख

लक्षद्वीप हे ठिकाण भारतीयांसाठी पर्यटनासाठी हॉटस्पॉट बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील आठवड्यात लक्षद्वीपला भेट दिली. त्यानंतर हे ठिकाण अचानक प्रकाशझोतात आले आहे. समुद्रकिनारी त्यांचा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. त्यावर मालदीवच्या मंत्र्यांनी सोशल मीडियावर केलेल्या "अपमानजनक" टिप्पणीविषयी तेथील सरकारने हे "मत वैयक्तिक आहे" आणि त्याच्या दृष्टीकोनाचे प्रतिनिधित्व करू नये असे मत व्यक्त करत कारवाई केली. आधुनिक भारतात विकासाचा अर्थ खूपच बदलला आहे. विकास पर्यावरण अनुकूल क्षमतांसह अनुकूल असणे आवश्यक आहे, त्यामुळे पर्यावरण अनुकूल विकासाद्वारे नेहमीच समृद्ध होण्याची आवश्यकता असते. लक्षद्वीप हे एक असे ठिकाण आहे जेथे विकासाची मोठी व्याप्ती आहे परंतु पर्यटन विकासाच्या बाबतीत तेथे फारसे लक्ष दिले गेलेले नाही. लक्षद्वीप हे भारतातील सर्वात कमी कनेक्टेड क्षेत्रांपैकी एक आहे. यामध्ये एक विमानतळ आहे पण देशाविदेशाशी कनेक्टिव्हिटी फार नाही. जर लक्षद्वीपला पर्यटकांसाठी तयार करावे लागले तर पर्यटन-अनुकूल पायाभूत सुविधा योग्यरित्या स्थापित करणे आवश्यक आहे. पर्यटकांच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी लक्षद्वीप आगामी काळात केंद्राच्या सहाय्याने प्रयत्न करेल अशी अपेक्षा आहे. लक्षद्वीपचे नैसर्गिक सौंदर्य भारताच्या कोणत्याही प्रदेशात अतुलनीय आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा लक्षद्वीपला एक नवी ओळख देणारा ठरेल याविषयी शंका नाही. 




वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त