वाड्यात विद्यार्थी व पालक समुपदेशन कार्यशाळा संपन्न

सौ ऋतुजा बांगर यांचा स्तुत्य उपक्रम

माऊली ब्रेन डेव्हलपमेंट आणि समुपदेशन केंद्र, अशोकवन वाडा यांच्या वतीने वाडा शहरातील पी जे हायस्कुल तसेच स्वामी विवेकानंद हायस्कुल या शाळांतील विद्यार्थी व पालकांसाठी दिनांक २७ जानेवारी २८ जानेवारी रोजी विद्यार्थी व पालक कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी ब्रेनवे रिसर्च फाउंडेशन, पुणे येथील ब्रेनवे फाउंडेशनचे सर्वेसर्वा संचालक श्री डॉ अशोक सोनावणे उपस्थित होते. तसेच पंचायत समिती वाडा गट शिक्षणाधिकारी श्री भगवान मोकाशी, ज्ञानदा प्रकाशन चे सर्वेसर्वा व सामाजिक कार्यकर्ते श्री युवराज दादा ठाकरे  आदी मान्यवर उदघाटन प्रसंगी उपस्थित होते. पी जे हायस्कुल येथील इयत्ता ८वी व ९वी च्या एकूण ६०० विद्यार्थी तर स्वामी विवेकानंद हायस्कुलमधील इयत्ता ५वी ते ९वी च्या जवळपास ५०० विद्यार्थ्यांनी या समुपदेशन कार्यशाळेचा लाभ घेतला. विद्यार्थी व पालकांसाठी आयोजित या कार्यशाळेचे यशस्वी आयोजन माऊली ब्रेन डेव्हलपमेंट आणि समुपदेशन केंद्राच्या सौ ऋतुजा बांगर व श्री ज्ञानोबा तुकोबा सत्संग सेवा संस्थेचे हभप राजेश म बांगर यांनी केले. मुलांच्या अष्टावधानी बौद्धिक विकासासाठी व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा प्रकारच्या विद्यार्थी व पालकांच्या समुपदेशन शिबिरांची समाजात आवश्यकता असून येत्या काळात खेडोपाडी असणाऱ्या शाळांमध्ये हा उपक्रम राबवणार असल्याचे मत सौ ऋतुजा बांगर यांनी व्यक्त केले. ग्रामीण भागातील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी व त्यांना स्पर्धेच्या युगात टिकवून ठेवण्यासाठी राबवत असलेल्या ह्या स्तुत्य उपक्रमासाठी समाजातील सर्व स्तरांतून श्री व सौ बांगर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 


वैभव


Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त