मास्क, स्वच्छता व सामाजिक अंतर ही त्रिसूत्री वापरा
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
वातावरणातील बदलांमुळे सध्या सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. याला कारणीभूत हवेतील वाढते प्रदूषण तसेच अशुद्ध पाणी हेदेखील घटक आहेत. याचा परिणाम श्वसनाचे आजार बळावण्यात होत असून सार्वजनिक ठिकाणी हा संसर्ग मोठया प्रमाणावर पसरत आहे. कोरोना ह्या जीवघेण्या आजाराचे नवनवे व्हेरिएन्ट सध्या येत असून त्या पार्श्वभूमीवर अशा संसर्गापासून वाचण्यासाठी योग्य काळजी घेतलीच पाहिजे. यासाठी सार्वजनिक ठिकाणी वावरताना सोशल डिस्टनसिंग व मास्कचा वापर केला गेला पाहिजे. व्यक्तिगत व परिसराची स्वच्छता राखली तर दूषित वातावरणामुळे होणारे हे आजार टाळता येतील. पिण्याचे पाणी गाळून, उकळून प्यायला हवे. मुख्य म्हणजे संसर्ग जडल्यानंतर तात्काळ वैद्यकीय उपचार सुरू करणे हितावह आहे जेणेकरून आजार बळावणार नाही. स्वतःसोबत कुटुंबाचीदेखील काळजी घेण्याची जबाबदारी आपलीच आहे. मुख्यत्वे घरातील लहान मुले व वृद्ध व्यक्तींना संसर्गापासून दूर ठेवले पाहिजे. मास्क, स्वच्छता व सामाजिक अंतराच्या त्रिसूत्रीचा वापर केला तर अशा संसर्गजन्य आजारांपासून आपणास परावृत्त होता येईल.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment