नवे वर्ष नवी मोहिम
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ISRO ने गेल्या काही वर्षात अनेक मोहिमा यशस्वी करत अंतराळ संशोधन क्षेत्रात जागतिक ठसा उमटवलेला आहे. नुकतेच चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर, इस्रोने जगाचे लक्ष वेधून घेतले होते. चंद्र आणि सूर्यानंतर आता इस्रो अंतराळातील गूढ उकलणार आहे. अंतराळातील क्ष-किरण स्त्रोतांच्या तीव्र ध्रुवीकरणाची तपासणी करण्यासाठी इस्रो नवीन वर्षाची सुरुवात पहिल्या क्ष-किरण पोलारिमीटर उपग्रहाच्या प्रक्षेपणाने करणार आहे. १ जानेवारी २०२४ ला उपग्रह लॉन्च होईल. हे भारताचे पहिले समर्पित ध्रुवीय मिशन आहे. ही मोहीम इस्रोसाठी अत्यंत महत्त्वाची असून ती यशस्वी करण्यासाठी ISRO रात्रंदिवस काम करत आहे. या उपग्रहामध्ये दोन मुख्य पेलोड असतील, एक बेंगळुरूस्थित रमण संशोधन संस्थेने विकसित केला आहे आणि दुसरा इस्रोच्या यू ए राव सॅटेलाइट सेंटर, इस्रोने विकसित केला आहे. अंतराळ मोहिमांमध्ये एकापेक्षा एक सरस कामगिरी करणाऱ्या इस्रोची ही आणखी एक महत्वाकांक्षी मोहीम असून यामुळे भारत अवकाश संशोधन क्षेत्रात आणखी एक मैलाचा दगड पार करणार आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment