ऑनलाईन गेम्सच्या विळख्यात तरूणाई

लोकांना ऑनलाइन व्यवहारांमधून गंडा घालणाऱ्या कंपन्या व महाभागांबरोबरच आता ऑनलाईन गेमिंगद्वारे लुबाडणूक करणाऱ्या काही कंपन्या अस्तित्वात आलेल्या आहेत. शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच व्यावसायिक व नोकरदारांमध्येही ऑनलाईन गेमिंगचे फॅड वाढत चाललेले आहे. यातूनच अनेकांचा वेळ व पैसा जुगारात खर्ची होत आहे. क्रिकेट, पत्ते यासारख्या गेम्सच्या आहारी आजची तरुणाई गेल्याचे चित्र आहे. सहजरित्या उपलब्ध होणार अँड्रॉइड फोन व इंटरनेट यामुळे शालेय मुलांच्या हातीदेखील अद्ययावत फोन आले आहेत. क्रिकेटमधील ऑनलाइन गेमिंगमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. त्याच्या जाहिराती करणाऱ्या अनेक अभिनेते व खेळाडूंवर टीका झाली. जनहित याचिकाही दाखल झाल्या. मात्र गेमिंग कंपन्या मोठमोठे वकील लावून यातून सुटका करून घेताना दिसतात. गेमिंग कंपन्यांच्या विवीध प्लॅटफॉर्मवर सध्या देशभरात 55 कोटींहून अधिक ग्राहक आहेत. ते दररोज 500 कोटींचा, वर्षाला 1.80 लाख कोटींचा सट्टा लावतात अशी धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. नोकरदारांकडून या गेमिंगवर संपूर्ण पगाराची यात उधळपट्टी होत आहे. बेरोजगार, महाविद्यालयीन विद्यार्थी कर्ज काढून हा जुगार खेळतात. यातून कर्जाच्या विळख्यात अडकलेले अनेक तरुण दुर्दैवाने आत्महत्येचा मार्गही पत्करत आहेत. जुगाराला व सट्टेबाजीला प्रोत्साहन देणाऱ्या अशा कंपन्यांवर खरेतर बंदी आणण्याची आवश्यकता आहे. हजारो कुटुंबे उध्वस्त करणारे ऑनलाईन गेम बिनदिक्कतपणे सर्वत्र खेळले जात आहेत. सायबर विश्वातील अत्यंत धोकादायक अशा ह्या सामाजिक विषयाकडे लक्ष देण्यास कुणास वेळ नसेल देशातील तरुणांचे भविष्य ह्या ऑनलाईन गेमिंग चालवणाऱ्या कंपन्यांच्याच हाती आहे असेच मानावे लागेल. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त