पुस्तकभेटीचा आनंद

कार्यालयात कुणाचाही वाढदिवस, निवृत्ती वा पदोन्नती असो, नित्यनेमाने त्यांना पुस्तक भेट देण्याचा उपक्रम गेली अनेक वर्षे मी कायम ठेवलेला आहे. खरंतर ह्या सर्व व्यक्ती आपापल्या क्षेत्रातील नैपुण्य व विशेषत्व धारण केलेल्या असतात. आपल्यावरील जबाबदारीला यथायोग्य न्याय देण्यासाठी सतत प्रयत्नशील दिसतात. एखादे निमित्त साधून त्यांना छोटीशी भेट देऊन सन्मानित करण्याचा प्रसंग, भविष्यात त्यांचे व्यक्तिविशेष अधिक चांगल्या प्रकारे फुलवण्यासाठी नक्कीच पोषक ठरतो असे मत आहे. त्यामुळे वेळ व सवड पाहून सहकाऱ्यांसह त्यांना पुस्तकरूपी शुभेच्छा देण्याची संधी मी सोडत नाही. या आठवड्यात कार्यालयातील जनसंपर्क अधिकारी श्री विकास सावंत, कार्यक्रम अधिकारी श्री अमित जयस्वाल यांचे वाढदिवसाचे निम्मित साधत शुभेच्छा दिल्या तर टाटा रुग्णालयात नव्या जबाबदारीसाठी रुजू होत असलेल्या डॉ अंकिता अहिरे यांना सहकारी अधिकाऱ्यांसह कार्यालयातून निरोप देत ह्या नव्या संधीसाठी शुभेच्छा दिल्या. वैभव

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त