सरकते जिने अथवा एकमजली लिफ्ट बसवा

घणसोली ते सिएसएमटी व्हाया हार्बर लाईन असा दररोजचा प्रवास मी करतो. या मार्गावरील नवी मुंबईतील जवळपास सर्वच रेल्वे स्थानकांवर बहुतांश प्रवाशी ट्रान्स हार्बरवरून हार्बर रेल्वे मार्गावरील गाडी पकडण्यासाठी रेल्वे फलाट ओलांडण्याचा मार्ग निवडतात. अगदी महिला प्रवाशीदेखील यात अग्रेसर दिसतात. या प्रयत्नात अनेक प्रवाशी पडून जखमी झाल्याची उदाहरणे मी पाहिली आहेत. सध्या फलाटांवर दोन्ही बाजूला असलेला स्लोप नाहीसा करून लोखंडी जाळ्या बसवण्याचा पर्याय रेल्वेने निवडला असला तरी प्रवाशी त्यालाही न जुमानता उड्या मारून एका फलाटावरून दुसऱ्यावर जात असल्याचे दररोज पहायला मिळते. अंडरग्राउंड सबवे मधील पायऱ्या चढउतार करून अगदी नगण्य प्रवाशी फलाट बदलण्याचा मार्ग निवडतात. याला कारणीभूत जिने चढउतार करताना लागणारा वेळ व अनेकांना पाठ मणक्याचे असलेले विकार हेदेखील आहे. मध्य रेल्वेच्या बहुतांश स्थानकांवर फलाट बदलण्यासाठी सरकते जिने बसवण्यात आलेले आहेत. तसेच एकमजली लिफ्ट देखील अनेक स्थानकांत पाहायला मिळतात. हीच पद्धत नवी मुंबईतील स्थानकांवर वापरायला हरकत नाही. असे केल्यास धोकादायक पद्धतीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या बऱ्याच अंशी कमी होईल असे वाटते. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त