जॉय ऑफ गिव्हिंग चा विद्यार्थी सहाय्य उपक्रम
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
जॉय संस्थेच्या वतीने विद्यार्थी सहाय्य उपक्रमाचे आयोजन
मुंबईच्या जॉय ऑफ गिव्हिंग ह्या सामाजिक संस्थेमार्फत पालघर जिल्ह्यातील केळठण (वज्रेश्वरी) येथील सरस्वती गणपत पाटील ह्या आदिवासीबहुल विद्यार्थी शाळेत शैक्षणिक साहीत्य वाटप उपक्रमाचे आयोजन शनिवार दिनांक २४ ऑगस्ट २०२४ रोजी करण्यात आले आहे. यावेळी शाळेतील माध्यमिक वर्गांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. एस जी पाटील विद्यालय ही ग्रामीण भागातील शाळा ८वी ते १०वी च्या मुलांना उत्तम शिक्षण देण्याचे कार्य गेले अनेक वर्षे करत असून या शाळेत परिसरातील आदिवासी समाजातील मुले संघर्षमय परिस्थीतीत शिक्षण घेत आहेत. जॉय संस्थेचे सभासद यावेळी शाळेत प्रत्यक्ष उपस्थित राहून सदर सहाय्य मुलांपर्यंत पोहोचवणार असल्याची माहिती संस्थेचे नवी मुंबई समन्वयक वैभव पाटील यांनी दिली. जॉय संस्थेच्या वतीने आजवर पालघर व ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागातील अनेक शाळांमध्ये, आश्रमशाळांत, अनाथ व वृद्धाश्रमांमध्ये विविध जीवनावश्यक व शैक्षणिक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे अनेक सभासद जॉय संस्थेशी जोडले गेलेले असून त्यांच्या संवेदनशील वृत्तीमुळे संस्थेच्या प्रत्येक उपक्रमास त्यांचे यथाशक्ती व भरीव योगदान लाभते. यामुळेच संस्थेच्या वतीने सातत्याने गरीब गरजू घटकांपर्यंत विविध स्वरूपात मदत पोहोचवणे शक्य होत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष गणेश हिरवे सर यांनी सांगितले. गरजू मुलांना त्यांच्या दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या वस्तू दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारे हास्य संस्थेचे कार्य अधिक जोमाने पुढे नेण्यासाठी बळ देत असल्याचे आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त व तब्बल ४५ वेळा रक्तदान करणाऱ्या गणेश हिरवे यांनी सांगितले. तसेच सदर उपक्रमादरम्यान पश्चिम रेल्वेचे सेवानिवृत्त मोटरमन व जॉय संस्थेचे सभासद श्री चंद्रशेखर सावंत यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमावेळी जमा झालेली जवळपास १००च्या वर पुस्तके जिल्हा परिषद शाळा, काटी, जिल्हा पालघर या दुर्गम भागातील शाळेत ग्रंथालय निर्मितीसाठी भेट देण्यात येणार आहेत. २४ तारखेला होणाऱ्या उपक्रमात संस्थेचे वैभव पाटील, चंद्रशेखर सावंत, गजानन पाटील, भूषण मुळे, असूंता डिसोझा, निलेश घोडविंदे, मंगेश देवकर आदी सभासद सहभागी होणार असून सरस्वती पाटील शाळेतील विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करणार आहेत. सदर उपक्रमासाठी सहाय्य करणाऱ्या सर्व सभासदांचे अध्यक्ष हिरवे यांनी आभार व्यक्त केले आहेत.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment