भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा

दोन दिवसांपूर्वी विरार जवळ अर्नाळा गावामध्ये एका पिसाळलेल्या कुञ्याने चक्क २८ जणांवर हल्ला करून त्यांना चावा घेतल्याची घटना घडली. यात २७ वर्षाच्या तरुणाची बुधवारी पोलीस भरतीची लेखी परीक्षा होती. माञ  कुत्र्याच्या हल्ल्यात तो इतका गंभीर जखमी झालाय की त्याला धड चालताही येत नाही. त्याच बरोबर कुञ्याच्या या हल्ल्यात लहान मुलांपासून अनेक जेष्ठ नागरिकदेखील जखमी झाले आहेत. त्यांना कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमा झाल्या आहेत. या कुत्र्याने माणसांबरोबरच अनेक कुत्र्यांनाही चावे घेतलेले आहेत. चावणारा कुत्रा जर रेबीज ग्रस्त असेल तर इतरांनाही हा आजार होण्याची शक्यता आहे. अर्नाळ्याच्या ह्या समुद्र किनारी जवळपास दीड हजार भटकी कुञी फिरत असल्याचा स्थानिकांचा दावा असून यापूर्वीही अनेकदा असे हल्ले झाल्याचे ते सांगतात. या कुञ्यांच्या दहशतीने लहान मुलं एकट्याने बाहेर खेळायला पडत नाहीत. हातात काठी घेऊन मुलांना बाहेर पडावं लागत आहे. महानगरपालिकेकडून सातत्याने भटक्‍या कुत्र्यांची नसबंदी करण्यात येत असल्‍याचा दावा केला जातो. परंतु रस्‍त्‍यावर दिसणारा भटक्‍या कुत्र्यांचा भस्‍मासुर पाहिला तर पालिकेच्‍या नसबंदी क्रियेबाबत शंका येतेच पण नसबंदी केल्‍यानंतरदेखील या कुत्र्यांचा उपद्रव कमी न झाल्‍याचेच दिसुन येते. मुंबई पालिका हददीमध्‍ये दरवर्षी हजारो लोकांना श्‍वानदंश होत आहे. रात्रीच्‍या वेळी दुचाकीस्‍वारांच्‍या मागे लागल्‍याने त्‍यांचे होणारे अपघात व नागरिकांना या भटक्‍या कुत्र्यांच्‍या भुंकण्‍याने रात्रीअपरात्री होत असलेला त्रासदेखील असहय आहे. या भटक्‍या कुत्र्यांची केवळ नसबंदी न करता त्‍यांची रस्‍त्‍यावरील संख्‍या कमी केली गेली पाहिजे. अशा पद्धतीने भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी होणाऱ्या नागरिकांचे रक्षण करण्याची जबाबदारी महानगरपालिकेचीच आहे. यासाठी मोकाट कुत्र्यांच्या बाबतीत होणाऱ्या तक्रारी दुर्लक्षित करून चालणार नाही. गल्लोगल्ली फिरत असलेली ही असंख्य कुत्री हद्दपार करण्यासाठी ठोस उपाययोजना अंमलात आणाव्याच लागतील. यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेऊन अद्ययावत कार्यप्रणाली स्थानिक स्वराज्य संस्थांना देणे इष्ट ठरेल. 



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त