स्टंटबाजना आवरण्यासाठी मोठया प्रबोधनाची गरज

लोकलमध्ये स्टंट करत असताना अपंगत्व येण्याच्या प्रसंगी जीव जाण्याच्या अनेक दुर्घटना मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर घडलेल्या आहेत. त्यातून बोध घेत अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी कुणी प्रयत्न करत असेल तर ती चांगलीच बाब आहे. अशा प्रकारचे स्टंट करताना रस्त्यावर, डोंगरमाथ्यावर, जलशयांमध्ये तसेच अनेक पर्यटन स्थळांवर अनेक महाभाग दिसून येतात. त्यातील अनेक जण तर जीवानिशी गेल्याचीही अनेक उदाहरणे आपल्याला दिसून आलेली आहेत. अशा हौश्यांना आवर घालण्याची खरेतर गरज आहे. प्रत्येक ठिकाणी पोलीस अथवा प्रशासकीय यंत्रणा पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे खूप मोठया प्रबोधनाची गरज आहे. कुटुंबातील लोक, स्वयंसेवी संस्था अथवा सामाजिक संवेदनशील घटक यांचेमार्फत तरुणांमध्ये याबाबत जनजागृती केली तर अशा दुर्घटनांना बऱ्याच अंशी आळा बसेल. सार्वजनिक ठिकाणांवर जागरूक समाजघटक यामध्ये महत्वाची भूमिका बजावू शकतात. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांची व अतिउत्साही स्वभावाच्या दुष्परिणामांची जाणीव लोकांना करून दिली तर नक्कीच परिवर्तन घडेल.



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त