कागदांमधील खाद्यपदार्थांवर बंदी हवी

कागदांमध्ये गुंडाळलेले खाद्यपदार्थ आरोग्याला अत्यंत घातक असल्याचे स्पष्टीकरण भारतीय अन्न सुरक्षा प्राधिकरणाने यापुर्वीच दिलेले आहे. रस्त्यावरील विक्रेते, फेरीवाले, हॉटेल चालक अशा प्रकारे रद्दीच्या कागदांचा वापर ग्राहकांना खाद्यपदार्थ देण्यासाठी करतात. अशा कागदांवर असलेल्या शाईत विषारी रंगद्रव्ये व घातक रसायने असल्याकारणाने अन्नपदार्थांमध्ये हि रसायने मिसळतात व लोकांच्या पोटात जातात. लहान मुले व वयोवृद्ध व्यक्तींची रोगप्रतिकार शक्ती हे पदार्थ खाल्यामुळे झपाट्याने कमी होत जाते. पोटाचे विकार तसेच कर्करोगासारखे भयंकर आजार हे पदार्थ खाल्याने होऊ शकतात. त्यामुळेच अन्नपदार्थ गुंडाळण्यासाठी वर्तमानपत्रांच्या कागदांचा वापर करू नये असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केलेले आहे. या कागदांवरील शाईत असणारे विषाणू व जिवाणू शरीराला अपायकारक असून त्यामुळे आरोग्य बिघडण्याचा धोका स्पष्ट करण्यात आलेला आहे. कागदाचा पुनर्वापर करून छापलेली वर्तमानपत्रे, कागद व कार्डबोर्ड बॉक्समध्ये धातू, खनिज तेल व विषारी रसायने आढळत असल्यामुळे पचनाच्या समस्यांबरोबरच विषबाधाही संभवते. यामुळे कागदात गुंडाळलेले खाद्यपदार्थ लोकांनी टाळायला हवेत. त्याचबरोबर अशा प्रकारे खाद्यपदार्थ कागदांमध्ये गुंडाळून विकणाऱ्यांवर कारवाई देखील होणे आवश्यक आहे. प्लॅस्टिकबंदीप्रमाणे कागदांमध्ये खाद्यपदार्थ देण्यावरदेखील निर्बंध आणायला हवेत.



वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त