निष्पक्ष चौकशीचा अभाव

निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे अनेक इमारती, पूल, होर्डिंग्ज पडून दुर्घटना होण्याच्या घटना वारंवार घडत असतात. यात वित्त हानी बरोबरच अनेक निष्पाप जीव जगाचा निरोप घेतात. अशा वेळी सर्वांच्या तात्पुरत्या संवेदना जाग्या होतात. काही दिवस चौकश्या, स्ट्रक्चरल ऑडिट, कारवाई यांचा फास चालतो. मात्र सारा मामला शांत झाला की चर्चाही थंडावतात आणि आरोपीही सुटतात, अशी परिस्थिती बहुतांश घटनांमध्ये दिसून येते. मुळात, अशा प्रकारच्या वास्तू घोटाळ्याच्या गर्तेतच उभ्या राहतात. त्यामुळे होणाऱ्या दुर्घटनांना जबाबदार घटक त्यानंतर होणाऱ्या चौकशांमधून साहिसलामत बाहेर पडण्यासाठी जंग जंग पछाडतात. अशा घटनांची पारदर्शक चौकशी करणारी व त्याचा अखेरपर्यंत पाठपुरावा करणारी यंत्रणाच आपल्याकडे नसल्यामुळे दुर्दैवाने ह्या घटनांचे गांभीर्य समाजात फक्त क्षणिक असते. 



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 


Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त