महाराष्ट्र मराठी वृत्तपत्रलेखक संघाच्या २४व्या वर्धापन दिन संमेलनात नवी मुंबईतील पत्रलेखक वैभव मोहन पाटील उत्कृष्ट वृत्तपत्रलेखक पुरस्काराने सन्मानित
महाराष्ट्र मराठी वृत्तपत्रलेखक संघाच्या २४व्या वर्धापन दिन संमेलनात नवी मुंबईतील पत्रलेखक वैभव मोहन पाटील उत्कृष्ट वृत्तपत्रलेखक पुरस्काराने सन्मानित
मराठी वृत्तपत्र लेखक संघ या राज्यस्तरीय संस्थेचा २४वा वर्धापन दिन तसेच यंदाच्या पत्रकार दिनाचे औचित्य साधुन पत्र लेखकांचे राज्यस्तरीय संमेलन सोमवार दिनांक ६ जानेवारी २०२४ रोजी दादर येथे आयोजित करण्यात आले होते. ह्या निमित्ताने राज्यातील नामवंत पत्रकारांना पत्रकार भूषण तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले. या प्रसंगी नवी मुंबई येथील वृत्तपत्रलेखक वैभव मोहन पाटील यांना उत्कृष्ट वृत्तपत्रलेखक पुरस्कार २०२५ ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मभूषण, माजी राज्यपाल व माजी केंद्रीय मंत्री श्री राम नाईक हे होते. दादरच्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सभागृहात आयोजित ह्या कार्यक्रमाप्रसंगी जेष्ठ पत्रकार श्री मधुकर भावे, श्री भाऊ तोरसेकर तसेच डॉ सुकृत खांडेकर आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी विचारमंचावरील अतिथींची मंत्रमुग्ध करणारी भाषणे पार पडली. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांना विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. शिक्षण, कृषी व उद्योग क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीसाठी राज्यातील विविध भागांतील मान्यवरांना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पत्रकारिता क्षेत्रातील आव्हाने व त्याचा सामना करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत मान्यवरांनी उपस्थितीत पत्रकारांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाध्यक्ष राम नाईक यांनी आपल्या जीवनातील साहित्य क्षेत्रातील अनेक अनुभव कथन करत स्थानिक राजकारण ते केंद्रीय मंत्री व राज्यपाल पदापर्यंत प्रवास उलगडला. याप्रसंगी आद्य पत्रकार, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना २१३व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सर्वच मान्यवरांनी राज्य मराठी वृत्तपत्रलेखक संघाचे संस्थापकव अध्यक्ष एकनाथ बिरवटकर यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment