मलेशिया येथील पामा ग्लोबल इंटरनॅशनल स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांची दैदिप्यमान कामगिरी
मलेशिया येथील पामा ग्लोबल इंटरनॅशनल स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांची दैदिप्यमान कामगिरी
पामा ग्लोबलद्वारे आयोजित २३व्या पामा ग्लोबल इंटरनॅशनल स्पर्धेत भारतातील विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान कामगिरी केली. ही स्पर्धा मलेशिया मध्ये दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी पार पडली आणि २८ देशांतील ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग घेतला. अभिमानाची बाब म्हणजे भारतामधून ४४ विद्यार्थ्यांची निवड या स्पर्धेसाठी करण्यात आली होती. पामा इंडिया या संस्थेने भारतातून विद्यार्थ्यांना ह्या ABACUS स्पर्धेसाठी निवडले होते आणि त्या यादीत नवी मुंबईच्या स्किल क्रीएशन्स एजुकेशनल सेंटर चे ८ विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत भारताला गौरवाचे स्थान मिळवून दिले. सर्व विद्यार्थ्यांच्या मेहनतीला फळ आलं आणि त्यात विशेष उल्लेखनीय कामगिरी केली ती सुर्यांश रासकर ह्या विद्यार्थ्याने, ज्याने चॅम्पियन पदक पटकावले. त्याचप्रमाणे ह्या सेंटरच्या दक्ष बारस्कर तृतीय, सार्थक लोहार द्वितीय, मानसी पोपळे तृतीय, स्वरा कदम प्रथम, दक्ष तेरसे द्वितीय, विपुल यादव द्वितीय, रिद्धी शेट यांनी तृतीय क्रमांकाचे पदक मिळवत देशाचे आणि शहराचे नाव उज्वल केले.
ही स्पर्धा विद्यार्थ्यांना त्यांच्या बुद्धीमत्तेचा आणि चातुर्याचा योग्य ठिकाणी उपयोग करण्याची संधी देते. स्किल क्रीएशन्स प्रशिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मिळालेल्या प्रशिक्षणामुळे त्यांचा आत्मविश्वास आणि कार्यक्षमता वाढली. याशिवाय, त्यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या अनुभवामुळे त्यांना भविष्यात आणखी मोठ्या यशाची संधी मिळणार आहे. आंतराष्ट्रीय स्पर्धेतील विद्यार्थ्यांच्या ह्या दमदार कामगिरीबद्दल त्यांचेवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून पालक व संस्थेचेदेखील कौतुक करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment