वनवासी कल्याण आश्रम, चिंचवली केंद्रात ‘रानपाखरं’ च्या ७५ व्या अंकाचा प्रकाशन सोहळा संपन्न
वनवासी कल्याण आश्रम, चिंचवली केंद्रात ‘रानपाखरं’ च्या ७५ व्या अंकाचा प्रकाशन सोहळा संपन्न
वनवासी कल्याण आश्रम विद्यार्थी वसतिगृह, चिंचवली केंद्र, पनवेल येथे २४ जानेवारी २०२६ रोजी ‘रानपाखरं’ या मासिकाच्या ७५ व्या अंकाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या अंकाचे प्रकाशन आश्रमातील मुलांच्या हस्ते करण्यात आले, ज्यामुळे मुलांमध्ये आनंदाचे वातावरण होते. या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. 'रानपाखरं'च्या संपादिका मृदुला परचुरे यांनी ‘रानपाखरं’च्या प्रवासावर प्रकाश टाकला. सह-संपादिका सुवर्णा भट यांनी साहित्याचे महत्त्व विशद केले. कोकण प्रांत संघटन मंत्री प्रदीपजी पाटील यांनी संघटनेची भूमिका व कार्यावर मार्गदर्शन केले. ज्योतीताई जपे व प्रियाताई आचवल यांनी शिक्षण आयामाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी वरिष्ठ कार्यकर्ते कोचरेकर काका, हेमांगी भागवत आणि माजी पालक भाटवडेकर यांचीदेखील प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे स्वरूप, कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन चिंचवली केंद्रप्रमुख विवेक फुफाणे यांनी केले. उपस्थितांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आणि वाचन संस्कृती जोपासण्यासाठी प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाचा समारोप प्रियाताई आचवल यांनी आभार मानून केला. 'रानपाखरं' हा अंक कै. सुनीताताई गोगटे यांनी २००४ साली वनवासी मुलांसाठी सुरू केला. हा अंक वनवासी कल्याण आश्रमच्या आश्रमशाळा, वसतिगृहे व संस्कार केंद्रांमध्ये वितरित केला जातो. वनवासी, ग्रामीण व शहरी भागात हा अंक त्याच्या वैविध्यपूर्ण माहिती, सदरं व आकर्षक मांडणीसाठी लोकप्रिय आहे.
Comments
Post a Comment