ताई (कविता) _ कु. ध्रुव गोतारणे

ताई 
तोंडाने नाय तर मी 
शब्‍दांनी बोलू पाहतोय 
तर आज मी पहा 
कायतरी लिहू पाहतोय 

लिहायलो गेलो तर 
लिहू तरी काय 
ताई शिवाय दुसरा 
विषयच सापडला नाय 

जेव्‍हा मित्रांनी सोडली 
माझी साथ 
तेव्‍हा ताईने फिरवला 
मायेचा हात 

ज्‍या ताईने माझेसाठी 
केलं इतकं काय 
तिच्‍याबददल वर्णन मी 
करु तरी काय   

जेव्‍हा जेव्‍हा नात्‍यांमुळे
लागतो घरात वणवा 
तेव्‍हा ताईच्‍या आवाजाने 
पसरतो सर्वत्र गारवा 

मित्रांमध्‍ये मी कितीही 
हसून जरी वावरतो 
हस-या चेह-यामागील दुःख 
फक्‍त तिलाच सांगू पाहतो 

शांत मला पाहून ती विचारी 
‘बंधूश्री झालंय तरी काय ?’
मी उत्‍तरतो ऋण तुझे प्रेमाचे 
‘फेडू तरी कसे काय ?’

देवा तुझे माझेवर 
उपकार आहेत फार 
मानलेली बहीण लावी 
माया मला जिवा पाड 

कवी ध्रुव गोतारणे 
मु. गातेस, ता. वाडा, 
जि. पालघर

Comments

Popular posts from this blog

असा किर्ती कुमार न होणे

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा