माझे कुटुंब, माझी जबाबदारी, आरोग्य सेवा आपुल्या दारी

कोरोनामुक्त महाराष्ट्र हेच आमुचे ध्येय

मीच माझ्या आरोग्याचा शिल्पकार



आली आली पहा, कोरोनाची लाट |
जनजीवन अन आरोग्याची, लागलीया वाट ||

सरकारी प्रयत्नांना, साथ देऊ सारे |
सामाजिक अंतराचे, नियम पाळू सगळे ||

मास्क वापरा सदैव, कंटाळा कशाला |
संसर्ग रोखायला, आडकाठी कशाला ||

लक्षणे दिसता, उपचारांची कास धरा |
अंगावर काढून, लपवू नका आजारा ||

कोरोनाचा संसर्ग, वाढू वाढू लागलाय |
मृतांचा आकडाही, वाढतच चाललाय ||

घरोघरी आरोग्य सर्वेक्षण, मोहीम आली सरकारी |
ध्यानात घ्या, माझे कुटुंब माझीच जबाबदारी ||

सरकारी सेवा येणार, आपल्या प्रत्येकाच्या दाराला |
तुमची साथ मोलाची, या सरकारी मोहिमेला ||

योग्य माहिती दिली पाहीजे, आरोग्य पथकाला |
लक्षणे दिसता उपचार घ्या, दडवू नका आजाराला ||

सर्दी, खोकला, ताप, अन कणकण वाटता |
उठा त्वरित जवळचा, सरकारी दवाखाना गाठा ||

आपणच होऊ आपल्या, आरोग्याचे शिल्पकार |
कोरोनाला करायचे आता, महाराष्ट्रातून हद्दपार ||

वैभव मोहन पाटील 




Comments

  1. Very nice vaibhavji. Liked it.

    ReplyDelete
  2. खुपच छान कविता आहे

    ReplyDelete
  3. छान अथँपू्णंँ कविता 😀😀🙏

    ReplyDelete
  4. वैभव सर कवितेच्या माध्यमातून आपण कोरोना आजाराबाबत फार छान जनजागृती केली आहे. अभिनंदन

    ReplyDelete
  5. खूपच छान कविता सर यू r always great

    ReplyDelete
  6. Very nice work.
    Hach amcha Devgharcha Vaibhav

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त